जिल्ह्यात आतापर्यंत दिड लाख कोरोना चाचण्या पुर्ण

चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर: जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत आरटीपीसीआरद्वारे 74 हजार 552 तर अन्टीजेन टेस्ट कीटद्वारे 75 हजार 551 असे एकूण एक लाख 50 हजार 103 नमुन्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी एक लाख 27 हजार 377 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 19 हजार 948 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन हजार 101 नमुन्यांचा अहवाल प्रतिक्षाधीन आहे तर 677 नमुन्यांचा निष्कर्ष निघू शकलेला नाही.
जिल्ह्यात मागील 24 तासात 103 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 193 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार 814 बाधितांवर उपचार सुरू आहे.
आज मृत झालेल्या बाधितामध्ये चिमुर तालुक्यातील नेहारी येथील 35 वर्षीय महिला, आजाद वार्ड वरोरा येथील 65 वर्षीय पुरूष व ब्रम्हपुरी तालुक्यातील तेलवसा येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 302 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 279, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 193 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 58, चंद्रपूर तालुक्यातील सात, बल्लारपुर तालुक्यातील 13, भद्रावती 33, ब्रम्हपुरी 17, सिंदेवाही दोन, मुल चार, सावली दोन, पोभुर्णा एक, गोंडपीपरी चार, राजुरा सहा, चिमुर सहा, वरोरा 26, कोरपना आठ, जीवती तालुक्यातील दोन व इतर जिल्ह्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here