‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ विषयावर पोलीस कुटुंबीयाकरीताची रांगोळी स्पर्धा संपन्न

चंद्रपूर:कोरोना महामारीच्या काळात आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी जनजागृती करण्याच्या उददेशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे यांचे संकल्पनेतुन माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर पोलीस कुटुंबीयांकरीता आज दिनाक २९/११/ २०२० रोजी पोलीस बहुदद्शीय सभागृह चंद्रपुर येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेमध्ये चंद्रपुर जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कुटुंबातील महिला सदस्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. या रांगोळी स्पर्धेमध्ये स्पर्धकाकडुन कोरोना महामारी काळात आरोग्य विषयी घ्यावयाची काळजी बद्दल विविध स्लोगन, संदेश, चित्रांचा समावेश असलेला आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या. सदर रांगोळी स्पर्धेचे परिक्षक म्हणुन चंद्रपुर जिल्हयातील सुप्रसिध्द चित्रकार, कलकार मुखपृष्ठाकर श्री. सुदर्शन बारापात्रे यांना आमंत्रित करण्यात आले होते. सदर स्पर्धेत एकुण ३२ पोलीस कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी प्रथम क्रमांक कु. भाग्यश्री सदाशिव पेंदाम यांना ४ हजार रोख व प्रमाणपत्र आणि ट्रॉफी, द्वितीय कृमांक श्रीमती प्रतिभा राजेग जंगम ३ हजार रोख व प्रमाणपत्र आणि ट्रॉफी, तृतिय कमांक कु. निशा यशवंत कोसमशिले २ हजार रोख व प्रमाणपत्र आणि ट्रॉफी यांना देण्यात आला. तर प्रोत्साहनपर शितल सज्जन निरंजने, रश्मी विजय घोटे, प्रिती मुन्ना सोयाम, नेहा सुरेश मेश्राम, शितल मुलींधर नन्नावरे यांना प्रत्येकी १ हजार रूपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकांना या उपक्रमात सहभाग घेतल्याबदद्ल प्रमाणपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले.

सदर कार्यकमाचे प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे यांनी कोरोना महामारी मध्ये कोरोना योध्दा म्हणुन कर्तव्य बजाविणारे पोलीस कुटुंबीयांना आरोग्य विषयक घ्यावयाची काळजीचे सवय लागुन पोलीस कुटुंबीय आणि सर्व जनतेमध्ये या विषयी जागरूकता निर्माण करण्याचे दृष्टीने सदर उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगीतले. सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे, श्रीमती साळवे, पोलीस उपअधीक्षक(गृह) श्री.शेखर देशमुख, पोलीस निरिक्षक श्री. शिवलाल भगत, पोउपनि.अश्विनी वाकडे आणि पोलीस अमलदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन महिला पोलीस अमलदार मंगला घागी यांनी केले तर आभार प्रदर्शन पो.नी. श्री. शिवलाल भगत यांनी केले.सदर कार्यक्रमात पोलीस वसाहतीतील पोलीस कुटुंबीय आणि पत्रकार बंधु आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here