अवैध रेती वाहतुकीवर भरारी पथकाचा छापा

वाहन जप्त करून दंड वसूल

चंद्रपूर, दि. 29 नोव्हेंबर :- जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता भरारी पथकाद्वारे छापे टाकने सुरू आहे. दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा खनिकर्म विभागाच्या भरारी पथकाने पोभूर्णा- बल्लारपुर मार्गावर विना परवाना रेती वाहतूक करणार्‍या वाहन क्र. एम.एच. 34 एबी 1761 जप्त करून तहसिलदार पोभूर्णा यांचे कडे सुपूर्दनाम्यावर सुपूर्द केले. तसेच दि. 28 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता मौजा विचोडा ता. चंद्रपूर येथे इराई नदी घाटावर रवींद्र वाढरे रा. विचोडा यांच्या मालकीचे ट्रक्टर क्र. एम. एच. -34 एल 2001 द्वारे अवैध रेती वाहतूक करत असल्याचे आढळून आले. सदर ट्रक्टर जप्त करुन दंडात्मक कार्यवाही करण्यात येवून एक लाख 10 हजार 900 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
उक्त वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -1966 अन्वये पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here