भद्रावती शहरात वजन काटा तपासुन केली कार्यवाही  

अखिल भारतिय ग्राहक पंचायत भद्रावती यांच्या मागणी ला प्रतिसाद

भद्रावती:अखिल भारतिय ग्राहक पंचायत भद्रावती यांच्या मागणीला प्रतिसाद देत भद्रावती शहरातील बुधवारी किराणा दुकाणे, फळ-भाजी विक्रेते, हार्डवेअर दुकाणे व ईतर दुकाणे यांच्या वजन काट्याची तपासणी करून वैध मापण शास्त्र विभागाकडुन जप्तची कार्यवाही करण्यात आली.
भद्रावती शहरातील अनेक ग्राहकांच्या तक्रारी अखिल भारतिय ग्राहक पंचायत भद्रावती यांच्याकडे येत असल्यामुळे अखिल भारतिय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी मा. सहाय्यक नियंत्रक, वैध मापण शास्त्र विभाग चंद्रपुर यांचे कडे वजन काटा तपासणी करण्याची मागणी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत मा. सहाय्यक नियंत्रक बोकडे साहेब यांच्या मार्गदर्शनात मा. निरिक्षक वाळे साहेब आणि चमुने बुधवारी भद्रावती शहरातील किराणा दुकाणे, हार्डवेअर दुकाणे, फळ-भाजी विक्रेते व ईतर दुकाणातील वजन काट्याची तपासणी करून भद्रावती शहरातील सात दुकानदारावर जप्तची कार्यवाही करण्यात आली.
अखिल भारतिय ग्राहक पंचायत भद्रावती यांचे कडुन संपुर्ण भद्रावती शहरातील दुकाणदार यांना आव्हाहन करण्यात येते की दुकानातील वजन काट्याची शासनाच्या नियमानुसार वेळोवेळी तपासणी करून घ्यावी आणि जप्तची कार्यवाही टाळावी.
अखिल भारतिय ग्राहक पंचायत भद्रावती चे पदाधिकारी प्रविण चिमुरकर, वसंत वर्हाटे, वामण नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, अशोक शेंडे, गुलाब लोणारे, गोपिचंद कांबळे यांच्या मागणीला प्रतिसाद दिल्याबद्दल मा. सहाय्यक नियंत्रक बोकडे साहेब आणि मा. निरिक्षक वाळे साहेब आणि चमुचे आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here