संविधान देशाचा मानबिंदू, सर्वांनी संविधानाचा सन्मान करावा: महापौर राखी कंचर्लावार

चंद्रपूर:भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरिता महानगरपालिका चंद्रपुर च्या वतीने दिनांक 2६ नोव्हेंबर २०२० ला सकाळी 11.00 वाजता माननीय महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिवसाच्या शुभेच्छा देतांना माननीय महापौर म्हणाल्या की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक 26 नोव्हेंबर १९५० रोजी भारताची स्वतंत्र घटना अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केलेली आहे. सर्वांनी संविधानाचा सन्मान करावा. संविधान देशाचा मानबिंदू आहे. असे मनोगत माननीय महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी व्यक्त केले. व भारतीय संविधान दिवसाच्या चंद्रपूर शहरवासीयांना व सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. संविधान दिनानिमित्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भारताचे संविधान उद्देशिकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली.  
 याप्रसंगी मनपा  उपायुक्त  .श्री. विशाल वाघ  ,श्री. संतोष कंदेवार , श्री. मनोज गोस्वामी, नगरसेविका सौ. अंजली घोटेकर ,सौ. पुष्पाताई मुन ,सौ. माया उईके ,नगरसेवक श्री. स्नेहल रामटेके, श्री. नागेश नित , श्री संतोष गर्गेलवार , वैष्णवी रिठे श्री. गुरुदास नवले , श्री. प्रदीप पाटील सौ. माधवी दाणी ,सौ. संघमित्रा पुणेकर,सौ. गीता पोलपोलवार ,योगिता बारसे , याप्रसंगी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  संविधान उद्देशिकेचे वाचन श्री वारूलवार  यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here