चंद्रपूर विधानसभा मतदार यादी पुनरिक्षण : 30 नोव्हेंबरपुर्वी आक्षेप नोंदवा

मय्यत, स्थलांतरीत, दुबार मतदारांची यादी मतदान केंद्रावर प्रसिद्ध
चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर :- भारत निवडणुक आयोगाची 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र याद्यांचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्याअनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी मतदार यादीचे पुननिरीक्षण करुन मय्यत/स्थालांतरीत/दुबार मतदारांची तयार केलेली यादी मतदान केंद्रावर तसेच तहसिल कार्यालय, चंद्रपूर येथे प्रसिध्द करण्यात आलेली आहे. लोक प्रतिनिधत्व अधिनियम 1950 च्या कलम 22 अन्वये सदर यादीतील मतदारांचे नाव मतदार यादीतुन वगळणे आवश्यक आहे.
वरील संदर्भात ज्या मतदारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2020 पुर्वी तहसिल कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालयीन दिवशी व वेळेस आक्षेप सादर करावे. सदर मुदतीमध्ये कोणाचेही लेखी म्हणने व रहीवाशी पुरावा प्राप्त झाले नाही, तर सदर यादीतील स्थलांतरीत/मय्यत/दुबार मतदारांची नावे वगळण्यास काही हरकत नाही असे गृहीत धरुन मतदार यादीतुन सदर मतदाराचे नावे वगळण्यात येईल, असे 71- चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार चंद्रपूर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here