माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेसचे धरणे आंदोलन

चंद्रपूर,२६ नोव्हेंबर:
आज गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत चंद्रपूर येथील गांधी चौकात केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ गांधी चौक, चंद्रपुर येथे कामगार नेते मा. श्री. नरेशबाबू पुगलिया ( माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ) यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेसच्या वतीने भव्य धरणे आंदोलन कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर नियोजित स्थळी ‘बैठा सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले.

मा. श्री. नरेशबाबूंच्या नेतृत्वात बैठा आंदोलन सुरू असतांनाच ओ.बी.सी. संघर्ष समितीच्या वतीने ओ.बी. सी. च्या न्याय मागण्यासाठी तसेच संविधान दिनाच्या निमित्त संविधान बचाव साठी काढलेल्या विशाल मोर्चाचे आगमन गांधी चौकातील आंदोलन मंडपापर्यंत होताच उपस्थित कामगार व शेतक-यांनी मोर्चाचे स्वागत केले, ओ.बी.सी. चा विजय असो “, “भारतीय संविधान जिंदाबाद” अशा घोषणांनी गांधी चौक निणादून गेले. मा. बाबूजींच्या उपस्थितीत मोर्चात सहभागी सर्वांना बिस्कीट व पाण्याच्या बाटल्स वाटप करण्यात आले.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात कोविडमुळे निर्माण झालेल्या संकटाचा गैरफायदा घेत सर्व अस्त्विात असलेले कामगार कायदे संपुष्टात आणून चार कामगार संहिता ( लेबर कोर्ट ) पारीत केले. त्याचबरोबर शेतकरी यांना अडचणीत आणून बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना फायदे होतील व त्या कंपन्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा काळ बाजार करण्यास संधी मिळेल. असे कायदे पारीत केले आहेत. लॉकडाउन काळात कोट्यावधी कामगार व लहानमोठे अद्योजक, कारखानदार धंदे नसल्यामुळे अडचणीत आले. याउलट देशातील मोठया कॉर्पोरेट कंपन्यांचे मुल्य अब्जावधी रूपयांनी वाढले आहे. आपल्या अधिकारांचे, लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी तसेच केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी आणि देशविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी कामगार वर्गाने सिध्द होणे गरजेचे आहे. दिनिंक २६ नोव्हेंबर, २०२० रोजी म्हणजे संविधान दिनाच्या निमित्ताने देशातील सर्व कामगार, शेतकरी, छोटे व्यापारी, वाहतूकदार इत्यादींनी इतर विभागासोबत एक दिवसाचा ऐतिहासिक संप करण्याचा निर्णय मा. डॉ. जी. संजीवा रेड्डी यांचे नेतृत्वाखाली केंद्रीय कामगार संघटनांच्या बैठकीत झाला आहे. कामगार, किसान संघटनांच्या बरोबरीने बिगर भाजप राजकीय पक्षांनी या संपास पाठिंबा दर्शविला आहे.
याप्रसंगी श्री राहूल पुगलिया माजी महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, श्री गजाननराव गावंडे अध्यक्ष विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चंद्रपूर जिल्हा, श्री करण पुगलिया उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस, श्री चंद्रशेखर पोडे अध्यक्ष इंटक चंद्रपूर जिल्हा, अॅड विजय मोगरे, श्री स्वप्नील तिवारी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा NSUI, दुर्गेश चौबे, शिवचंद्र काळे सदस्य जिल्हा परीषद चंद्रपूर, मनपा नगरसेवक श्री अशोक नागापूरे, श्री देवेंद्र बेले, श्री प्रशांत दानव, कामगार नेते सर्वश्री तारासिग कल्सी, देवेंद्र गहलोत, अजय मानवटकर, रामदास वाग्दरकर, क्रिष्णन नायर, विरेन्द्र आर्य, रविन्द्र खाडे, बी.सी.करमरकर, अमोल हलदर, निताई घोष, अनिल तुंगीडवार, सुभाष माथनकर, सागर बल्की, सुरेश रासेकर, बाबा मुन, श्रीनीवास गाडगे, उत्तम उपरे, रामेंद्र सिंह, बाळू खनके, अरूण बुरडकर, श्रीनिवास पारनंदी, सुधाकरसिंह गौर, बाबूलाल करूणाकर, पुथ्वी जंगम व अन्य कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here