संविधान दिनी २६ नोव्हेंबर ला आयोजित ओबीसी विशाल मोर्चाची तयारी पूर्ण

चंद्रपूर,25 नोव्हेंबर:संविधानाने दिलेले पण मागील ७० वर्षात शासन प्रशासनात कब्जा करुन बसलेल्या व्यवस्थेने नाकारलेले संवैधानीक हक्क अधिकार मिळण्याच्या तसेच ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर येथे संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२० ला आयोजीत ओबीसी विशाल मोर्चाची तयारी अंतिम टप्यात असून जिल्ह्याच्या तसेच चंद्रपूर जिह्याच्या विविध भागातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना चंद्रपूरातील नागरीक, पोलीस प्रशासन व विविध सामाजिक संघटनानी सहकार्य करून लाखाच्या वर संख्येने चंद्रपूर शहरात येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना सहकार्य करून मोर्चा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ओबीसी विशाल मोर्चाचे आयोजक ओबीसी जनगणना समन्वय समितीचे संयोजक बळीराज धोटे, डॉ. राकेश गावतूरे, अँड. दत्ता हजारे, प्रा. विजय बदखल, अॅड. पुरूसोत्तम सातपुते, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रा. सुर्यकांत खनके, प्रा. माधव गुरनुले, डॉ. अभिलाषा गावतुरे, अँड. प्रशांत सोनुले प्रा. अनिल डाहाके, सतिश मालेकर, डॉ. राजु ताटेवार, अविनाश आंबेकर, योगेश आपटे, बंडू हजारे इत्यादीनी केले आहे.

मोर्चा प्रारंभ स्थळ : चंद्रपूर येथे दि. २६ नोव्हेंबर ला आयोजित ओबीसी विशाल मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज दिक्षाभुमि चंद्रपूर येथून निघेल. मोर्चात सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती कोविड नियमांचे पालन करीत मास्क घालून, अंतर राखून चालेल. मोर्चाच्या मार्गावर मोर्चेकऱ्यांनी शिस्तीने रांगेने चालावे यासाठी मदत करण्यासाठी ५०० पेक्षा अधिक प्रशिक्षीत व्हॉलेंटीयर्सची चमू राहणार असून, मोर्चात सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ति शिस्तबध्द स्वयंसेवक समजून पोलीस प्रशासनाला सहकार्य करेल आणि मोर्चा शांततेने पूर्ण करण्यासाठी सहकार्य करेल अशी माहिती ओबीसी जनगणना समन्वय समितीने दिली.

मोर्चाचा मार्ग – डॉ. आंबेडकर कॉलेज दिक्षा भुमि , चंद्रपूर येथून ६-६ च्या रांगेत निघणारा मोर्चा रामनगर चौक- जटपूरा गेट मार्गे – जयंत टॉकीज चौक – गांधी चौक, सराफा लाईन मार्गे, कस्तुरबा चौक – कस्तुरबा रोड मार्गे जटपूरा गेट – प्रियदर्शिनी चौक मार्गे चांदा क्लब ग्राऊंड वर विशाल जाहिर सभेत रूपांतरीत होईल. मोर्चाचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ : ओबीसी विशाल मोर्चा व्दारा मा. प्रधानमंत्री भारत सरकार तसेच मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार
यांना निवेदन देण्यासाठी मोर्चा आयोजनातील ओबीसी जनगणना समन्वय समितीचे १५ कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची भेट घेऊन निवेदन देतील. मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था : चंद्रपूर शहरात मोर्चासाठी, चंद्रपूर तालुक्यातील गावोगावचे ओबीसी वाहनाव्दारे येणार आहे.त्यासाठी वाहनांची पार्किंग व्यवस्था खालील प्रमाणे:

* मुलमार्गे व दुर्गापूर रोड मार्गे वाहने – लॉ कॉलेज समोरील व विद्याविहार कॉन्व्हेंट मारगील प्रशस्त मैदान .

* बल्लारपूर बायपास मार्गे येणारी वाहने लॉ कॉलेज व विद्याविहार कॉनवेंट मागील मैदान * बल्लारपूर रोड महाकाली मंदिर मार्गे येणारी वाहने- कोहीनुर ग्राऊंड, महाकाली मंदिर परिसरातील मनपा मैदान श्री. रामराव चहारे यांचे वाडीतील खुली जागा.

* पठाणपुरा रोड मार्गे येणारी वाहने कोहीनुर ग्राऊंड.

* नागपूर रोड मार्गे येणारी वाहाने – विदया निकेतन शाळा, गौरव सेलिब्रेशन लॉन, लोकमान टिळक विद्यालय स्टेडियम जवळ, सेंट मायकेल स्कुल मैदान, चांदा पब्लीक स्कुल इंदिरा गार्डन स्कुल, सिंधी कॉलनी दांडीया मैदान तथा पिंक प्लॅनेट बाजुचे मैदानात पार्किंग केल्या जातील.
मोर्चाचा समारोप – ओबीसी विशाल मोर्चाचे चांदा क्लब ग्राऊंड येथे सभेत रूपांतर होणार असून सभा स्टेजवर मोर्चा आयोजन समितीचे पदाधिकारी राहतील, मोर्चा मध्ये विविध पक्ष, सामाजिक संघटना, जातीय संघटनांचे प्रतिनिधी व नागरीक फक्त ओबीसी म्हणून सहभागी होणार आहे. सभास्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोर्चा आयोजन समिती व चंद्रपूर मनपा, यंग चांदा ब्रिगेड व्दारा करण्यात आलेली आहे.सभा परिसररात चंद्रपूर मनपाव्दारे पिण्याच्या पाण्याचे टँकर व मोबाईल स्वच्छता गृहे, ठरवून दिलेल्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
विशेष सुचना : मोर्चासाठी येणाऱ्या ओबीसींनी मास्क घालुन यावे. तसेच सोबत दोन पाण्याच्या बॉटल्स, जमल्यास चिवडयाचे एक पॅकेट सोबत आणावे. मोर्चाकऱ्यांनी कोणीही कचरा करून नये. मोर्चेकऱ्यांना चंद्रपूरच्या जनतेने केवळ पिण्याचे पाणी दयावे, मोर्चातील लोकांना कोणतेही खाद्य पदार्थ देऊ नये अशी ओबीसी जनगणना समन्वय समितीने विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here