
राज्य सरकार विरोधात राज्यव्यापी घंटानाद आंदोलन
चंद्रपूर: उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या जाहीरनाम्यात ज्याला ते *वचननामा* म्हणतात त्यात त्यांनी ३०० युनिट विज वापर करणाऱ्यांना वीज दर ३०% टक्के कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सामान्य वीज दर कमी करणे तर सोडाच परंतु १ एप्रिल पासून २०% वाढवून लॉकडाउन काळात राज्यातील बहुतांश जनतेला जे अव्वाच्या सव्वा वीज बिल आले त्याला देखील कसलीही माफी किंवा सवलत देणार नाही असे काल जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अहोरात्र जप करणाऱ्या शिवसेनेने या महागड्या विजबिलांबाबत अत्यंत दुटप्पी भूमिका घेऊन जनतेसोबत लबाडी केली आहे. शिवराय दुष्काळ किंवा कुठल्याही अस्मानी संकटांच्या वेळी प्रजेची काळजी घेत असत, त्यांना दिलासा मिळेल असे निर्णय घेत होते, याउलट त्यांच्या नावाने चालणारा शिवसेना पक्ष आणि अहोरात्र शिवरायांचा जप करणारे उद्धव ठाकरे मात्र नेमकी उलटी भूमिका घेत आहेत. कोरोनामुळे अनेक लोकांच्यावर बेरोजगारी आणि मंदीची कुऱ्हाड कोसळली असताना लॉकडाउन काळातील अवाजवी अतिमहागड्या विजबिलात माफी/सवलत न देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा जखमेवर मीठ चोळण्यासारखाच आहे.
जून महिन्यापासून आम आदमी पार्टी वीज दर कपात आणि लॉकडाउन काळात वीज बिल माफीसाठी सातत्याने आंदोलन करत आहे. श्री उध्दव ठाकरे यांनी जनतेची फसवणूक केली म्हणून पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली, परन्तु पोलिस प्रशासनाने सुध्दा दखल घेतली नाही, त्यामुळे आज आम आदमी पार्टीच्या वतीने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन तसेच शिवसेनेचा विधानसभा निवडणुकीतील वचननामा जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला आहे.
आम आदमी पार्टीचे प्रदेश संयोजक रंगा राचुरे यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले . जोपर्यंत राज्य सरकार हा तुघलकी निर्णय मागे घेत नाही आणि दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकार प्रमाणेच राज्यातील नागरिकांना २०० युनिट पर्यंत वीज माफी देत नाही तो पर्यंत हा लढा असाच सुरू राहील.
आजच्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल देवराव मुसळे , महानगर संयोजक राजेश विराणी , जिल्हा सचिव संतोष दोरखंडे ,मीडीया प्रमुख राजेश चेडगुलवार , जिल्हा कोषाध्यक्ष श्री.भिवराज सोनी सचिव महानगर राजु कुडे, कोषाध्यक्ष महानगर सीकंदर सागोरे , शंकर धुमाळे ऑटो संघटना जिल्हाध्यक्ष, मयूर राईकवार माजी संयोजक,श्री.पोटे,संदीप तुर्कयाल झोन 2 संयोजक,रिजवण शेख , पंडित गुरुप्रसाद द्विवेदी , गडे प्रसाद तिवारी, मारुती धकाते, भुवनेश्वर निमगडे,बशीर भाई आदिंसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.