शुक्रवारी 156 बाधितांची वाढ

चंद्रपूर, दि. 20 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 243 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 156 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 18 हजार 329 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 15 हजार 979 झाली आहे. सध्या 2 हजार 72 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 35 हजार 719 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 14 हजार 397 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये चिखलपरसोडी नागभिड येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 278 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 258, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here