लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वागत

चंद्रपूर,9 नोव्हेम्बर:महाराष्ट्र विधीमंडळाच्‍या लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने स्वागत करण्यात आले.तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके,माजी अध्यक्ष तथा परिषद प्रतिनिधी मुरली मनोहर व्यास,बबन बांगडे,सरचिटणीस सुनील तिवारी आदी उपस्थित होते.

आमदार श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की विधीमंडळाच्‍या लोकलेखा समितीचे नेतृत्व करण्याची संधी मला उपलब्ध झाली आहे त्यामुळे त्याचा फायदा राज्यातील जनतेला करून देण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. जिल्ह्यातील पत्रकारांचे विविध प्रश्नांवर देखील या वेळी चर्चा करण्यात आली.जिल्ह्या सोबतच राज्यातील पत्रकारांच्या समस्या आणि मागण्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ही आमदार मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here