चंद्रपूरकर रंगकर्मींनी एकत्र येत साजरा केला रंगभूमी दिन

चंद्रपूर:मराठी रंगभूमी दिनानिमीत्‍त आज चंद्रपूरकर रंगकर्मींनी एकत्र नाटयगृहे पुन्‍हा सुरू झाल्‍याबद्दल आनंद व्‍यक्‍त केला.चंद्रपूरच्‍या प्रियदर्शिनी नाटयगृहात चंद्रपूरकर रंगकर्मी आज एकत्र आले. पडदयाचे पूजन करत रंगकर्मी रंगमंचावर आले व श्री नटेश्‍वराचे विधीवत पूजन केले. ज्‍येष्‍ठ रंगकर्मी श्रीपाद जोशी, डॉ. जयश्री कापसे गावंडे, किशोर जामदार, अजय धवने, हेमंत गुहे, नूतन धवने, सुशिल सहारे, चैताली बोरकुटे – कटलावार, बकुळ धवने, तेजराज चिकटवार, पंकज नवघरे, अंकुश राजूरकर, अनिकेत परसावार, तुषार धुर्वे यांची यावेळी प्रामुख्‍याने उपस्थिती होती. पूजनानंतर सर्व रंगकर्मींनी श्री नटेश्‍वराचे स्‍तवन केले, नारळ फोडून नाटयगृह सुरू होण्‍याचा आनंद व्‍यक्‍त केला व परस्‍परांना रंगभूमीदिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here