चिंताजनक | 24 तासात 7 बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 5 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 269 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 174 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपुर शहरातील बाबुपेठ येथील 52 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील मोहर्ली येथील 30 वर्षीय पुरुषऊर्जानगर येथील 46 वर्षीय पुरुषघुग्घुस येथील 55 वर्षीय पुरुष,  चिमूर शहरातील 52 वर्षीय पुरुषपोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा येथील 32 वर्षीय पुरुष,चंद्रपूर जिल्ह्यातील साखरी येथील 61 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 249 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 233, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली सातयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 174 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 हजार 503 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 269 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 573 झाली आहे. सध्या 2 हजार 681 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 23 हजार 950 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 5 हजार 913 नमुने निगेटीव्ह आले आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 174 बाधितांमध्ये 101 पुरुष व 73 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 60, बल्लारपूर तालुक्यातील 10, चिमूर तालुक्यातील 9, मुल तालुक्यातील दोनगोंडपिपरी तालुक्यातील एकजिवती तालुक्यातील दोनकोरपना तालुक्यातील 13, ब्रह्मपुरी तालुक्यातील 9, नागभीड तालुक्‍यातील आठवरोरा तालुक्यातील 11, भद्रावती तालुक्यातील 25, सिंदेवाही तालुक्यातील तीनराजुरा तालुक्यातील 21 असे एकूण 174 बाधित पुढे आले आहे.

याठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील दुर्गापुरवृंदावन नगरकृष्णा नगररामनगरसिव्हील लाईननगीना बागबाबुपेठबालाजी वार्डतुकुमपठाणपुरा वार्डबाजार वार्डबंगाली कॅम्पभाना पेठ वार्डदाताळाघुग्घुसकबीर नगरसरकार नगरमोरवाघुटकाळा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

तालुक्यातून या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील टिळक वार्डकन्नमवार वार्डमानोराबामणी परिसरातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील खडसंगीलोहारागांधी वार्डवडाळा पैकु भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील डोंगरगाववार्ड नंबर 2 परिसरातून बाधित पुढे आले आहे.

 

गोंडपिपरी तालुक्यातील तळोधी परिसरातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील नवेगाव मक्तागुरुदेव नगरगुजरी वार्डतोरगाव खुरचोरगाव बुभागातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील तळोधीनवखळा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील टिळक वार्डराम मंदिर परिसर दत्त मंदिर वार्डमालवीय वार्डआनंदवन परिसरातून बाधित पुढे आले आहे.

भद्रावती तालुक्यातील मल्हारी बाबा सोसायटी परिसरराधाकृष्ण कॉलनी परिसरगणपती वार्डपंचशील नगरशास्त्रीनगरसंताजी नगरगुरु नगरसुरक्षा नगरनागसेन नगरझाडे प्लॉट परिसरभोजवाडगुरूनगर देवाला भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूरनवरगाव परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील मज्जिद वार्डसहकार नगरमाता मंदिर वार्डआझाद चौकभेदोडाकामगार नगरशिवनगर वार्डसोमनाथपूरसास्तीभारत चौक भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here