नगरपरिषदेसाठी आरक्षण सोडत 10 नोव्हेंबरला

चंद्रपूर दि.3 नोव्हेंबर :  चिमूर नगरपरिषद तसेच सावली व पोंभुर्णा येथील नगरपंचायतीचे आरक्षण सोडत  दि.10 नोव्हेंबर 2020 मंगळवार रोजी निश्चित करण्यात येणार आहे. यासंबंधाने जिल्हाधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली असून प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला त्यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.

चिमूर नगर परिषदेसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, सावली नगरपंचायती साठी महादेव खेडकर, पोभुर्णा नगरपंचायतीसाठी संजय कुमार डव्हळे यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 10 नोव्हेंबर 2020 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता सोडत पद्धतीने जागा निश्चित करण्यात येतील.तरी आरक्षण सोडतीच्या वेळी संबंधित नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here