भाजपची चंद्रपूर महानगर कार्यकारीणी जाहीर

चंद्रपूर:भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्‍हा (महानगर) शाखेचे अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी कार्यकारीणी जाहीर केली आहे. भाजपा चंद्रपूर जिल्‍हा (महानगर) शाखेचे संघटन सरचिटणीसपदी राजेंद्र गांधी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे तर सरचिटणीसपदी सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे आणि रविंद्र गुरनुले यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. भाजयुमो महानगर जिल्‍हा अध्‍यक्षपदी विशाल निंबाळकर यांची तर महिला आघाडी अध्‍यक्षपदी सौ. अंजली घोटेकर यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

भाजपा चंद्रपूर जिल्‍हा (महानगर) कोषाध्‍यक्षपदी प्रकाश धारणे यांची तर माध्‍यम संपर्क प्रमुखपदी प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. कार्यकारीणीच्‍या उपाध्‍यक्षपदी रामपाल सिंह, दशरथसिंग ठाकुर, अनिल फुलझेले, अॅड. सुरेश तालेवार, मोहन चौधरी, अरुण तिखे, मतिन शेख, राहुल घोटेकर, सौ. माया मांदाडे, गणेश गेडाम, सज्‍जाद अली, सुरज पेदुलवार, यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. सचिवपदी मनोज सिंघवी, राजेंद्र खांडेकर, प्रमोद शास्‍त्रकार, रवी जोगी, राजेंद्र तिवारी, अरविंद कोलनकर, प्रशांत चौधरी, सुर्यकांत कुचनवार, बलाई चक्रवर्ती, सय्यद शोएब याकुब अली, संदिप देशपांडे, निखिल तांबेकर, धर्मेंद्र पंडित,  सय्यद चांदभाई पाशा, अॅड. सारिका सांदुरकर, रामकुमार आकापेल्‍लीवार, राकेश बोमनवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

अनुसूचित जाती मोर्चा संयोजकपदी धम्‍मप्रकाश भस्‍मे, सहसंयोजकपदी निलेश हिवराळे, राजेश थुल, जितेंद्र वाकडे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. अनुसूचित जमाती मोर्चा संयोजकपदी धनराज कोवे, सहसंयोजकपदी किशोर आत्राम, शुभम मडावी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. अल्‍पसंख्‍यांक मोर्चा संयोजकपदी अमिन शेख यांची तर सहसंयोजकपदी सेबेस्‍टीयन जॉन, मोहसिन शेख यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. ओबीसी मोर्चा संयोजकपदी विनोद शेरकी यांची तर सहसंयोजकपदी शशिकांत मस्‍के, शैलेश इंगोले यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. सांस्‍कृतिक आघाडीच्‍या संयोजकपदी जगदिश नंदुरकर यांची तर सहसंयोजकपदी हेमंत गुहे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

महानगर जिल्‍हा भाजपाच्‍या नवनियुक्‍त  पदाधिका-यांचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, आ. किर्तीकुमार भांगडीया, आ. रामदासजी आंबटकर, आ. प्रा. अनिल सोले, आ. ना.गो. गाणार भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, विजय राऊत, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, प्रमोद कडू, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, भाजपा मनपा गटनेते वसंत देशमुख आदिंनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here