24 तासात 202 जणांनी केली कोरोनावर मात 

चंद्रपूर, दि. 2 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 202 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून केवळ 53 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील 60 वर्षीय पुरुष व चिमूर तालुक्यातील नेरी येथील 70 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 236 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 221, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सहा, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 53 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 15 हजार 990 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 202 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार एक झाली आहे. सध्या 2 हजार 753 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 21 हजार 98 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 3 हजार 848 नमुने निगेटीव्ह आले आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 53 बाधितांमध्ये 26 पुरुष व 27 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 33, पोंभुर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील दोन,   कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ,  वरोरा तालुक्यातील एक,भद्रावती तालुक्यातील एक, राजुरा तालुक्यातील दोन, नागभीड तालुक्यातील एक तर गडचिरोली येथील तीन असे एकूण 53 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील पठाणपुरा वार्ड, एकोरी वार्ड, लालपेठ, दुर्गापुर, नगीना बाग, राजा नगर कॉलनी परिसर, अंचलेश्वर वॉर्ड, जगन्नाथ बाबा नगर, इंदिरानगर, जलनगर, नानाजी नगर, भटाळी कॉलनी परिसर, म्हाडा कॉलनी, राजीव गांधी नगर, घुग्घुस, चिचपल्ली, बाबुपेठ, ऊर्जानगर भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडी, मालडोंगरी, सम्राट अशोक चौक परिसर, तळोधी परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील कापरे लेआउट परीसर, समता नगर, परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

नागभीड तालुक्यातील  जनकापूर भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील ज्योती नगर गडचांदूर भागातून बाधित ठरले आहे. पोंभूर्णा तालुक्यातील कसरगट्टा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here