दुर्लक्षित खडकी या कोलामगुड्यावर आंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

जिवती: तालुक्यातील अतीदुर्गम असलेल्या खडकी या कोलामगुड्याला आता विकासाची चाहूल लागली असून, आतापर्यंत विकासाचा मागमुसही नसलेल्या या वस्तीवर चिमुकल्यांवर संस्कार करण्याचे ध्येयपुर्तीसाठी आंगणवाडीची इमारत सज्ज झाली आहे.
आदिम कोलाम समुदायास विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोलाम विकास फाऊंडेशन कसोशीने प्रयत्न करीत आहे. बहात्तर वर्षाच्या प्रतिक्षेनंतर खडकीला रस्त्याचे दान लाभले. तोपर्यंत खडकीला कोणीही बाहेरचा व्यक्ती किंवा अधिकारी जाण्यास धजावत नव्हता. उदासवाणे आणि कंटाळलेले चेहरे घेऊन खडकीवासिय निरुत्तर झाले होते. कोलाम विकास फाऊंडेशनच्या प्रयत्नानंतर येथील कोलामांच्या चेह-यावर आशेचे किरण झळकू लागले. रस्ता झाला, पिण्याच्या पाण्याची सोय झाली. आता चिमुकल्यांवर संस्कार करणारी आंगणवाडीची इमारतही झाली.
दि. २७ आॅक्टोबर रोजी जिवतीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गराडे यांचे हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, पर्यवेक्षिका श्रीमती बारापात्रे, आरोग्य सेविका मनोरमा चौधरी, एम.एन. अरकरे, श्री. गोरे, गावपाटील जैतू कोडापे, झाडू कोडापे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आंगणवाडी सेविका मनकरणा केंद्रे यांनी केले.यावेळी परीसरातील कोलाम बाधव व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here