उमेदचे खाजगीकरण होऊ देणार नाही

चंद्रपूर:महाराष्ट्रात कोरोना काळातही महिलांवरील अत्याचार वाढले. आम्ही त्या विरोधात आंदोलन करतो पण शासन लक्ष देत नाही. मुख्यमंत्री फक्त उपदेश देतात आणि घरी सुरक्षित राहण्याचा सल्ला देतात. भाजपा सोबत सत्तेत असतानाही त्यांची हीच भूमिका होती. भाजपा काळातील योजना बंद करणे हा एकसूत्री कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारचा आहे. महिलांच्या बचतगटाला संजीवन देणारी भाजपा काळातील उमेद योजना खाजगीकरण व राजकारणासाठी महाविकास आघाडी सरकारने बंद केली. उमेदचेखाजगीकरण भाजपा महिला मोर्चा होऊ देणार नाही. आधुनिक नवदुर्गांनी आता या सरकारला जाब विचारला पाहीजे असे प्रतिपादन प्रदेश भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस दिपाली मोकाशी यांनी केले.
त्या आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा महानगर चंद्रपूर तर्फे बुरडकर सभागृह येथे आयोजित, मातृशक्ती सन्मान अभियान २०२० अंतर्गत नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळ्यात बुधवार (२८ऑक्टोबर) ला प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, जि प अध्यक्ष संध्या गुरनुले यांची तर अतिथी प्रदेश भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष वनिता कानडे, महापौर राखी कंचर्लावार, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेणुका दुधे यांची उपस्थिती होती.
दिपाली मोकाशी म्हणाल्या, हे सरकार जनहीताचे सरकार नाही. शेतक-यांना आर्थिक  स्वातंत्र्य देणा-या केंद्राच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास हे तयार नाही. मदतीच्या नावाखाली तुटपुंजी रकम देऊन बळीराजाच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. कोरोनाचा प्रकोप जास्त असताना दारू सुरू केली. पण निव्वळ भाजपाचा विरोध करावा म्हणून प्रार्थनास्थळे बंद ठेवली, या सरकारकडून अपेक्षा करू नका. नवदुर्गांनी आता हा लढा मोठा केला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी डॉ. प्रा.पद्मरेखा धनकर, अॅड. पारोमिता गोस्वामी, सौ उषा बुक्कावार, सौ प्राजक्ता भालेकर, सौ चैताली खटी, अर्चना मानलवार, सौ उषा मेश्राम, डॉ दीप्ती श्रीरामे, प्रमिला बावणे यांचा आधुनिक दुर्गा म्हणून सन्मानपत्र, सन्मान पदक व भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वनिता कानडे, राखी कंचर्लावार यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
सत्काराला उत्तर देताना अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी विद्यमान पालकमंत्रीचा खरपूस समाचार घेत   डॉ कुणाल खेमणार यांच्या कमिटीचा दारूबंदी वरील अहवाल जगजाहीर करावा अशी मागणी केली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदीसाठी कडक कायद्याचा अध्यादेश काढला, पण या सरकारने पुढे काही केले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रा) देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष महानगर डॉ मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहुल पावडे, गटनेते वसंत देशमुख, भाजपा नेते राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, प्रकाश धारणे, विशाल निंबाळकर, दत्तप्रसंन्न महादाणी, सुभाष कासगोट्टूवार, राहुल घोटेकर, नगरसेविका शीतल गुरनुले, चंद्रकला सोयाम, शिला चव्हाण, माया उईके, पुष्पा उराडे, वनिता डुकरे, वंदना तिखे, ज्योती गेडाम, कल्पना बगुलकर, आशा आबोजवार, प्रज्ञा बोरगमवार ब्रिजभूषण पाझारे, प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार अकापेलिवार, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका दुधे यांनी तर संचालन सविता कांबळे यांनी केले. वंदना तीखे यांनी आभार मानले. मंजुश्री कासंगोट्टूवार यांनी सन्मानपत्र वाचन केले. कार्यक्रमाच्‍या यशस्वीतेसाठी रवी जोगी, प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, सुनील डोंगरे, यश बांगडे, आकाश ठुसे, कुणाल गुंडावार, पवन ढवळे, सत्यम गाणार, प्रमोद क्षीरसागर, सुशांत आक्केवार,शुभम गिरटकर, महेश राऊत,मयूर जोगे, शुभम सुलभेवार, प्रवीण उरकुडे, सलमान पठाण आदींनी परिश्रम घेतले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here