होय, माणुसकी अजूनही जिवंत आहे !

प्यार फाऊंडेशनने वाचविला गर्भवती कुत्री व 3 पिल्ल्यांचा जीव

चंद्रपूर – मोकाट जनावरांचे रक्षण करणारी प्यार फाऊंडेशनने गर्भवती कुत्री व 3 पिल्ल्यांचा जीव वाचविला.रात्रीच्या सुमारास प्यार फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र रापेल्ली यांना एकाचा फोन आला, त्यांनी तात्काळ त्या गर्भवती कुत्रीला प्यार फाऊंडेशनच्या केअर युनिट मध्ये आणले, ती गर्भवती सकाळपासून तडफडत असल्याची माहिती त्यांना दिली त्यानुसार पशु अधिकारी डॉ कडुकर, डॉ. दुपारे यांनी त्या गर्भवतीवर उपचार सुरू केले असता तिच्या पोटातील 2 पिल्ले हे मृत झाले होते व 3 जिवंत होते.डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर त्या गर्भवती व 3 पिल्ल्यांना जीवनदान मिळाले.कुत्री व तिचे 3 पिल्ले हे प्यार फाऊंडेशनच्या केअर युनिट मध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here