
रिपब्लिकन स्टुंडट फेडरेशनचा उपक्रम
चंद्रपूर:संपूर्ण जगात कोरोना प्रादुर्भावामुळे विखडल्या गेल आहे त्यामुळे सर्वत्र या वर्षी १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त सगळे आंबेडकर प्रेमी यांनी घरीच जयंती साजरी केली आणि चंद्रपूर येथून रिपब्लिकन स्टूडेंट फेडरेशन च्या वतीने रांगोळी,विडिओ,उत्कृष्ट लेख,उत्कृष्ट कविता,आणि अनेक ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली होती व त्याचे रूपांतर शिल्पकार या स्मरणिकेत रिपब्लिकन नेते प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
या ऐतिहासिक दस्तावेजाचे अनावरण आंबेडकरी चळवळीचे युवा नेते प्रतीक डोर्लिकर यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक इरफान शेख, टिपू सुलतान फाउंडेशनचे शेख अमजद पापाभाई, युवा कवि स्वप्निल मेश्राम, नागपूर येथील जज व डांस डायरेक्टर समिर कुमार व रेडियो सिटी 91.1 एफ एम चे सिंगर संजय तायडे,
रिपब्लिकन स्टुंडट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राजस खोबरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यानिमित्ताने प्राचार्या सुशील बुजाडे, मृणाल कांबळे,ज्योती सहारे, श्रीकांत साव , प्रियंका चव्हाण, सुरज दहेगावकर यांचे मनोगत पर मार्गदर्शन झाले. यावेळी नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कु. रशमी बोरकर,दीक्षांत बारसागडे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले. या आयोजनाच्या यशासाठी शुभम शेंडे,लुम्बिनी गणवीर,यश उमरे ,हर्षल खोब्रागडे,अभिजीत तोतडे, सक्षम पार्थडे, निखील जिवणे, संघम शेलकर, कपिल गणविर, भानेश चिलमिल, अमोल शेंडे, क्षावसति तावाडे, रंजिता गजरे, जानवी चांदेकर रंजित उके आदिंनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे संचालन सुरभी मोडक, प्रास्ताविक प्रा.संघपाल सरकाटे,आभार सुमीत दुबे यांनी केले. या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.