खासगी प्रयोगशाळांच्या समोर दर फलक लावा : खासदार बाळू धानोरकर 

चंद्रपूर : खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यासाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे २०० रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दार खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. मोठ्या प्रमाणात खासगी प्रयोगशाळांना दर आकारत होते. आता मात्र राज्य शासनाने ९८० रुपयांपर्यंत हे दार आणले आहे. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तरी शासनाने आकारलेल्या दराचे फलक खासगी प्रयोगशाळाचा समोर लावण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकरी अजय गुल्हाने आणि चंद्रपूर शहर महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांना केल्या. 

 
कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर ९८० रु दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमुने गोळा करून तपासणी करण्यासाठी १४०० रु तर रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेऊन तपासणी करण्यासाठी १८०० रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेऊन राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट करून रुग्णांना दिलासा देण्याच्या प्रयत्न केला आहे.
 
चंद्रपुरात  कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात येत असून प्रति १० लोकसंख्ये मागे ७० हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून कोरोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल. राज्य भरात सुधारित दरानुसार रुग्णांकरून पैसे आकारण्यात यावे याकरिता  शासनाने आकारलेल्या दराचे फलक खासगी प्रयोगशाळाचा समोर लावण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकरी अजय गुल्हाने आणि चंद्रपूर शहर महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांना केल्या. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here