

चंद्रपूर,26 ऑक्टोबर:
विट्ठल मंदिर वार्ड,चंद्रपूर येथील प्रतिष्ठित नागरिक केशवराव नानाजी ठाकरे (84 वर्ष) यांचे आज सोमवार दि. 26 ऑक्टोबर 2020 रोजी वृद्धोपकाळाने दुःखद निधन झाले असून उद्या दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11:00 वाजता त्यांच्या निवास स्थानापासून अंत्ययात्रेस सुरुवात होईल व बिनबा गेट परिसरातील शांतिधाम येथे अंत्यविधी होणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार होता.प्रतिष्ठित व्यवसायी मोहन ठाकरे व राजन ठाकरे यांचे ते वडील तर माजी नगरसेवक बाळू ठाकरे यांचे मोठे वडील होते.