चंद्रपूर शहरातील 57 सह 183 बाधितांची नोंद

चंद्रपूर, दि. 21 ऑक्टोबर: जिल्ह्यात गत 24 तासात 160 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 183 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील मातोश्री शाळेजवळ तुकूम येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 209 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 198, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ पाच आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 183 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 13 हजार 990 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  160  बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 10 हजार 861 झाली आहे.  सध्या 2 हजार 920 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 11 हजार 934 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 96 हजार 477 नमुने निगेटीव्ह आले आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 183 बाधितांमध्ये  114 पुरुष व 69 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 57, पोंभुर्णा तालुक्यातील तीन, बल्लारपूर तालुक्यातील सात, चिमूर तालुक्यातील दोन, मुल तालुक्यातील 26, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील दोन, ब्रह्मपुरी तालुक्यातील 22, नागभिड तालुक्यातील 22,   वरोरा तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील सहा, सिंदेवाही तालुक्यातील 15, राजुरा तालुक्यातील 10, गडचिरोली येथील दोन असे एकूण 183 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील व परिसरातील बाबुपेठ, तुकूम, भिवापुर, वार्ड, ओम नगर, शिवाजीनगर घुग्घुस, म्हाडा कॉलनी परिसर, हनुमान नगर, नगीनाबाग, बापट नगर, बालाजी वार्ड, आनंदनगर, बंगाली कॅम्प परिसर, जलनगर वार्ड, बाजार वार्ड, स्नेहनगर, अंचलेश्वर वार्ड, लक्ष्मी नगर वडगाव, संजय नगर,नकोडा भागातून बाधित पुढे आले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्ड, गांधी चौक परिसर, कन्नमवार वार्ड, रविन्द्र नगर, गणपती वार्ड, बिल्ट कॉलनी परिसर, झाकीर हुसेन वार्ड भागातून बाधित ठरले आहे.वरोरा तालुक्यातील वैष्णवी नगर, लक्ष्मी नगर, आनंदवन, राजेंद्रप्रसाद वार्ड, वनोजा, करंजी परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील उदापूर, विद्यानगर, गांधी नगर, खेड, कीदवाई वार्ड, गुजरी वार्ड, कुरझा,मेढंकी, देलनवाडी, शारदा कॉलनी परिसर, पेठ वार्ड, पटेल नगर, सोंदरी, सुंदर नगर परिसरातून बाधित ठरले आहे.
भद्रावती तालुक्यातील सुरक्षा नगर, गांधी चौक परिसर, श्रीराम नगर,परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील सोमनाथपूर वार्ड, जवाहर नगर, आझाद चौक, विहिरगाव, धोपटाळा,भागातून बाधित पुढे आले आहे.
चिमूर तालुक्यातील नेताजी वार्ड,आबादी वार्ड भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर, कळमगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.नागभीड तालुक्यातील राम मंदिर चौक परिसर, शिवाजी चौक गिरगाव, तळोधी, गायमुख पार्डी, सुलेझरी, बाजार चौक भागातून बाधित पुढे आले आहे.
मुल तालुक्यातील नांदगाव, राजगड भागातून बाधित ठरले आहे. पोंभूर्णा तालुक्यातील कासरगट्टा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. जिवती तालुक्यातील भारी भागातून बाधित पुढे आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here