
आ.मुनगंटीवार यांची संकल्पना
व्हर्च्युअल सभेत भाजयुमोचा संकल्प
चंद्रपूर:आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील इच्छुक रक्तदात्यांची नोंद ‘आ. सुधीर मुनगंटीवार ऍप’ द्वारे केली जात आहे.भारतीय जनता पार्टीच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला यशस्वी करण्याची जवाबदारी भाजयुमो(युथ विंग)ने रविवार(१८ऑक्टोबर)ला झालेल्या व्हर्च्युअल सभेत स्वीकारल्याने रुग्णांना आता रक्तासाठी भटकावे लागणार नाही असा विश्वास आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा)देवराव भोंगळे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सभेत भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे,प्र. का.सदस्य राजेंद्र गांधी,माजी आ.प्रा.अतुल देशकर,पार्षद सुभाष कासंगोट्टूवार,महामंत्री संजय गजपुरे,प्रशांत विघ्नेश्वर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष(ग्रा)ब्रिजभूषण पाझारे, जिल्हाध्यक्ष(श)विशाल निंबाळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रारंभी प्रास्ताविकात या प्रकल्पाचे संयोजक ब्रिजभूषण पाझारे यांनी,आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची रक्तदाता नोंदणी बाबतची संकल्पना विशद करीत *”रक्तदाता-एक जीवनदाता”* या अभियानाची माहिती सर्वांना करून दिली.मंडलस्तरावर ही नोंदणी करावयाची असून प्रत्येक बूथवर रक्तदाते या प्रमाणे २०७० बूथ वर नोंदणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना देवराव भोंगळे यांनी बुथवर ५ रक्तदाते या प्रमाणे १०हजार रक्तदाते नोंदविण्याचे आवाहन करीत,याला मिशन म्हणून राबवावे.या ऍप मुळे गरजवंतांना रक्तदाते उपलब्ध लगेच उपलब्ध होतील.त्यामुळे एखाद्याचे प्राण वाचविता येईल. सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ मंगेश गुलवाडे म्हणाले,कोरोना संकटात भरीव कामगिरी करीत भाजपाने आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातील रक्तदानाच्या उपक्रमात किमान ८०० युनिट रक्त संकलन केले.त्याचा थेट लाभ सिकलसेल व थेलसीमियाच्या रुग्णांना झाला.रक्तदान हे समाजसेवेचे सर्वोत्तम मध्यम असून ८० टक्के समाजकारण व २० राजकारण करीत जनसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून द्या,असे आवाहन त्यांनी केले.भाजपा नेते राजेंद्र गांधी यांनी,रक्तदानासाठी यापूर्वी भाजपाने केलेल्या कार्याचा उल्लेख करीत इच्छाशक्तीच्या बळावरच हा उपक्रम यशस्वी होईल असे सांगितले.यावेळी सुभाष कासंगोट्टूवार यानीही मार्गदर्शन करीत नगरसेवकांना विशेष जवाबदारी द्यावी असे निवेदन केले.तर,प्रशांत विघ्नेश्वर यांनी,कोरोना काळात,आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वेच्छा रक्तदान करणाऱ्या ३३ संघटनांना सहभागी करण्याची विनंती केली.
व्हर्च्युअल सभेचे संचालन भाजयुमो महामंत्री आशिष देवतळे यांनी केले तर महामंत्री महेश देवकते यांनी आभार मानले.