चंद्रपूर शहरातील 56 सह 173 बाधितांची नोंद

चंद्रपूरदि.18 ऑक्टोंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसारजिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 173 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 13 हजार 400 वर पोहोचली आहे.  10 हजार 276 बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.  सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 925 बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात  24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्येमुंगोलीवणी यवतमाळ येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 10 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरदुसरा मृत्यू  शिवाजी चौक परीसरपोंभुर्णा येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 16 ऑक्टोबरला डॉ.पंत हॉस्पीटल,चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. दोनही बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार होता. पहिल्या बाधिताचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर तर दुसऱ्या बाधिताचा डॉ.पंत हॉस्पीटलचंद्रपूर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 199 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 188, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ पाच आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 56, बल्लारपुर तालुक्यातील पाचपोंभूर्णा तालुक्यातील तीनचिमूर तालुक्यातील चारमुल तालुक्यातील 11,  ब्रह्मपुरी तालुक्यातील 17,  नागभीड तालुक्‍यातील 12, वरोरा तालुक्यातील पाचभद्रावती तालुक्यातील 13,  सिंदेवाही तालुक्यातील  21,  राजुरा तालुक्यातील पाचगोंडपिपरी तालुक्यातील चारकोरपना तालुक्यातील 15, गडचिरोली व यवतमाळ येथील प्रत्येकी एक असे एकूण 173 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील बिनबा वार्डसिविल लाइनघुग्घुसस्नेह नगरऊर्जानगरतुकुमनगिनाबागघुटकाळा वार्डबालाजी वार्डलालपेठ कॉलरीदाद महल वार्डआकाशवाणी रोड परिसरजीएमसी  परिसरमहाकाली वार्डइंदिरानगरबाबुपेठकेरला कॉलनी परिसररामनगरभिवापुर वॉर्डविवेक नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्डराणी लक्ष्मीबाई वार्डविसापूर परिसरातून बाधित ठरले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील आष्टाशिवाजी चौकबोर्डा झुल्लुरवार भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील शिवनीनवरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापुरकरंजीनवीन बस स्टँड परिसरातून बाधित ठरले आहे. राजुरा तालुक्यातील विहिरगांववार्ड नंबर 4 परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मुल तालुक्यातील  वार्ड नंबर चारवार्ड नंबर 16, चिरोलीमारोडागडीसुर्लानांदगाव भागातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगरसुरक्षा नगरसुमठाणा  परिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील तळोदीपार्डीनवीन बस स्टॅन्ड परिसरसुलेझरी वार्ड नंबर 8 परीसरकोजाबी मालबाळापुरसावरगावपळसगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील एमएसईबी कॉलनी परिसरचैतन्य नगर बोर्डा परिसरातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूरउपरवाही परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधीनगरबाळापुर पेठ वार्डटिळक नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here