काव्यप्रेमी शिक्षक मंच चंद्रपूरच्या वतीने ऑनलाईन काव्यसंमेलन संपन्न

चंद्रपूर दि.१८:कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाले आहे.याचा फटका दरवर्षी होणाऱ्या काव्य संमेलनालाही बसला. अनेक कवी-कवयित्री काव्यसंमेलनाला मुकले.परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक ठिकाणी काव्य संमेलन घेतली जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्हयातील कवी कवयित्री यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी काव्यप्रेमी शिक्षक मंच(रजि) चंद्रपूरच्या वतीने गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन काव्य संमेलन पार पडले. सदर काव्य संमेलनात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कवी कवयित्री यांनी सहभाग घेतला.त्यामध्ये   पंडीत लोंढे,भारती लखमापुरे,हेमलता मेश्राम,प्रफुल्ल मुक्कावार,विजय भसारकर,नागेंद्र नेवारे,रवी आत्राम,मधुकर दुपारे,आनंदी चौधरी,चंद्रशेखर कानकाटे यांनी बहारदार रचना सादर केल्या.काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष आनंद घोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या काव्यसंमेलनात नागपूर विभागीय अध्यक्ष बाळासाहेब तोरस्कर व उपाध्यक्ष कविता कठाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन मालती सेमले तर आभार प्रदर्शन संगीता बांबोळे यांनी केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी किशोर चलाख, नीरज आत्राम, दुशांत निमकर, सुरेश गेडाम यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here