आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात उपलब्‍ध होणार गरम पाण्‍याच्‍या सात पाणपोई

चार फॉगींग मशीन व एक पोर्टेबल फॉगींग मशीन सुध्‍दा उपलब्‍ध होणार

कोविड 19 चा सामना करण्‍यासाठी आ. मुनगंटीवार यांचा वैशिष्‍टयपूर्ण उपक्रम

चंद्रपूर: माजी अर्थ मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात गरम पाण्‍याच्‍या सात पाणपोई नागरिकांच्‍या सेवेत उपलब्‍ध होणार आहेत. त्‍याचप्रमाणे निर्जंतुकीकरणासाठी चार फॉगींग मशीन व एक पोर्टेबल फॉगींग मशीन सुध्‍दा पोंभुर्णा नगर पंचायतीला उपलब्‍ध होणार आहे. कोविड 19 च्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर या महामारीचा सामना करण्‍यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या गरम पाण्‍याच्‍या पाणपोई व फॉगींग मशीन पोंभुर्णा शहरासाठी आमदार निधीतुन मंजूर केल्‍या आहेत.

नेहमीच अभिनव तसेच वैशिष्‍टयपूर्ण उपक्रमांच्‍या माध्‍यमातुन जनतेची सेवा आ. सुधीर मुनगंटीवार करीत असतात. कोविड 19 च्‍या महामारीचा सामना करताना त्‍यांनी सॅनिटायझेशनला विशेष प्राधान्‍य देत प्रारंभीच्‍या काळात सॅनिटायझर व मास्‍कचे वितरण नागरिकांमध्‍ये केले. त्‍यानंतर पोलिस स्‍टेशन, शासकीय कार्यालये, सार्वजनिक स्‍थळे इत्‍यादी ठिकाणी ऑटोमेटीक सॅनिटायझर मशीन त्‍यांनी उपलब्‍ध केल्‍या. कोविड 19 चा सामना करताना गरम पाण्‍याचा वापर अतिशय महत्‍वपूर्ण आहे. त्‍यामुळे प्रतिकार शक्‍ती वाढते. आयुष मंत्रालयाने प्रतिकार शक्‍ती वाढविण्‍याच्‍या उपायांमध्‍ये गरम पाणी पिण्‍याचा उपाय प्रामुख्‍याने सांगीतला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सुध्‍दा ‘मन की बात’ या कार्यक्रमात प्रतिकार शक्‍ती वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने गरम पाण्‍याचे महत्‍व अधोरेखित केले आहे. ही बाब लक्षात घेता गोरगरीब जनतेला गरम पाणी सहज व निःशुल्‍क उपलब्‍ध व्‍हावे यादृष्‍टीने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या आमदार निधीतुन सात गरम पाण्‍याच्‍या पाणपोई पोंभुर्णा शहरात उपलब्‍ध केल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे निर्जंतुकीकरणासाठी चार फॉगींग मशीन व एक पोर्टेबल फॉगींग मशीन पोंभुर्णा शहरात उपलब्‍ध केल्‍या आहेत. प्रामुख्‍याने लक्ष्‍मीनारायण मंदीर, चेक पोंभुर्णा, अंगणवाडी क्रमांक 2 समोर, अंगणवाडी क्रमांक 1 समोर, राजराजेश्‍वर चौक, कावळे यांच्‍या घरासमोर, आंबेडकर चौक या ठिकाणी या पाणपोई उपलब्‍ध होणार आहे.

येत्‍या आठवडयाभरात या पाणपोई पोंभुर्णा वासियांच्‍या सेवेत रूजु होतील. या आधीही आ. मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर शहरात 10 गरम पाण्‍याच्‍या पाणपोई उपलब्‍ध केल्‍या आहेत. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या या पुढाकाराबद्दल जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समितीच्‍या सभापती कु. अल्‍का आत्राम, उपसभापती सौ. ज्‍योती बुरांडे, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, नगर परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. श्‍वेता वनकर, उपाध्‍यक्षा सौ. रजिया कुरेशी, कु. शारदा कोडापे, ईश्‍वर नैताम, विजय कस्‍तुरे, मोहन चलाख, सौ. सुनिता मॅकलवार, सौ. पुष्‍पा बुरांडे, सौ. नेहा बघेल, किशोर कावळे, अजित मंगळगिरीवार, पंचायत समिती सदस्‍य विनोद देशमुख, गंगाधर मडावी आदींनी त्‍यांचे अभिनंदन व आभार व्‍यक्‍त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here