सय्यद रमजान अली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी (अल्पसंख्याक विभाग) चे प्रदेश अध्यक्ष एम.एम. शेख यांनी सय्यद रमजान अली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली आहे. पक्षाध्यक्षा मा.सोनियाजी गांधीजीच्या उच्च आदर्शानुसार कांग्रेस पक्षाची वाटचाल सुरु आहे. मा. नदीम जावेद चेअरमन, अखिल भारतीय कॅाग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग, मा. बाळासाहेब थोरात अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली व सोनियाजीच्या दृष्टीकोनातून समाजाच्या सर्व स्तरातील व विशेषत: तळागळातील शेवटच्या माणसापर्यत कांग्रेस पक्ष पोहचणे आवश्यक आहे व तेच विचार घेवून महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाचे काम सुरु असल्याने हि एक महत्वाची जबाबदारी सय्यद रमजान अली यांना सोपविण्यात आलेली आहे. सय्यद रमजान अली हे अनेक वर्षापासुन कांग्रेस पक्षात सक्रिय रित्या कार्यरत असल्याने व पक्षाशी निष्ठावंत असल्याने त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापुर्वी कांग्रेस पक्षाचे अनेक पदावर त्यांनी सक्रिय रित्या कार्य केलेले आहे. सय्यद रमजान अली यांनी आपली नियुक्तीचे श्रेय खासदार श्री बाळुभाऊ धानोरकर, मार्गदर्शक श्री नरेशबाबु पुगलिया, श्री जिया पटेल, श्री अब्दुल हमीद, श्री रहेमतुल्ला खान, श्री ओवेस कादरी सह पक्षाच्या अनेक मान्यवरांना दिले असुन सय्यद रमजान अली यांच्या नियुक्ती बद्दल अनेक स्तरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अशी माहिती एका पत्रकान्वये कळविण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here