आनंदाची बातमी ! जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट

चंद्रपूर, दि. 3 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिन्याभरात पहिल्यांदाच गेल्या 24 तासात 114 बाधित पुढे आले आहे. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 10 हजार 867 झाली आहे. 3 हजार 574 बाधितांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. 7 हजार 130 बाधित जिल्ह्यात आतापर्यंत बरे झाले आहेत. नागरिकांनी बाहेर पडतांना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखून दैनंदिन कामे करावे. नागरिकांनी आपला आजार लपवून न ठेवता, प्रशासनाला माहिती देऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात एका बाधितेचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भिवापूर वार्ड, चंद्रपूर येथील 76 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 1 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या बाधितेला कोरोनासह न्यूमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 163 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 154, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 78 बाधित, बल्लारपूर तालुक्यातील चार, मुल तालुक्यातील 9, जिवती तालुक्यातील एक,  कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील चार, नागभीड तालुक्यातील दोन, वरोरा तालुक्यातील चार, भद्रावती तालुक्यातील एक, सावली तालुक्यातील तीन,  सिंदेवाही तालुक्यातील सात असे एकूण 114 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहर व परिसरातून जीएमसी परिसर, शिवाजीनगर, बाबुपेठ, मुक्ती कॉलनी परिसर, नगीना बाग, सिस्टर कॉलनी, जटपुरा गेट परिसर, मेजर गेट परिसर, चोर खिडकी, अष्टभुजा चौक, सुमित्रा नगर, एकोरी वार्ड, ऊर्जानगर, विठ्ठल मंदिर वार्ड, बालाजी वार्ड, सिंधी कॉलनी परिसर, संजय नगर, घुटकाळा वार्ड, सिव्हिल लाईन, समता नगर, समाधी वार्ड, स्नेह नगर, तुकूम, श्रीराम वार्ड, कोतवाली वार्ड, वृंदावन नगर, बंगाली कॅम्प, अरविंद नगर, इंदिरानगर, जयनगर वार्ड, विवेक नगर या भागातून बाधित पुढे आले आहे.
तालुक्यातील या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील गौरक्षण वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह आढळले आहे.
मुल येथील वार्ड नंबर एक, वार्ड नंबर 16, वार्ड नंबर 17 तसेच तालुक्यातील सिंताळा, राजुली भागातून बाधित ठरले आहे.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बाजार चौक, स्नेहनगर, गुजरी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील वाढोणा, सावरगांव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड, मजरा भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील अंतरगाव, निमगाव भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही, मदनापुर वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here