लोकप्रतिनिधींनो, “कोरोना” झाला, शासकीय रूग्णालयात उपचार घ्या आणि मिळवा 50 हजार रूपये !

नाहिद काजी या समाजसेविकेचे बोलके आवाहन !

चंद्रपूर:चंद्रपूर शहरातील गांधी चौकात नाहिद काजी या समाजसेवीके ने काल रात्री एक बॅनर छळकवले. या बॅनरची आज शहरात चर्चा होऊन राहिली आहे. कोरोना ने जिल्ह्यात कहर माजविला आहे. सामान्य जनता भयावह स्थितीमध्ये आयुष्य करीत असताना शासकीय रुग्णालयात सामान्यांसाठी योग्य उपचार नाही, रुग्णाला भरती करण्यासाठी बेड नाही, ऑक्सीजन नाही अशी अवस्था झाली असताना, या आजाराचा बाजार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मात्र कोरोना झाल्यानंतर मोठ्या शहराची वाट धरली असून ही बाब जिल्हावासियांच्या अंतर्मनाला भिडली आहे. सामान्यजनांच्या मनात जी गोष्ट खदखदत आहे, त्याच गोष्टीला समाजसेविका व शिक्षिका नाहिद काजी या माजी नगरसेविकेने या बॅनरच्या माध्यमातून बोलते केले आहे. या बॅनरवर चक्क आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांना कोरोना झाला तर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घ्या व पन्नास हजाराचे बक्षीस जिंका असे खुले आव्हान केले आहे. जिल्ह्यामध्ये सामान्य नागरिकांची स्थिती वाईट आहे. ज्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी निवडून दिले आहेत, ते लोकप्रतिनिधी आज मतदार राजाच्या समस्या समजून घेत नाही हे दर्शविणारे हे बोलके बॅनर शहरात चर्चेचा विषय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here