शिक्षकांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान व्हावा –  खासदार  बाळू धानोरकर

चंद्रपूर-  माझे कुटुंब माझी जबाबदारी या कामाचे शासननिर्णयात उल्लेख नसतांना जिल्ह्यातील शिक्षकांना सरसकट आदेश दिल्याने शिक्षकांनी काम करण्यास नकार दिला होता मात्र आज खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी संघटना व प्रशासन यांच्यात चर्चा घडवून प्रशासनाने बहुतांश मागण्या मंजूर केल्यामुळे शिक्षक हे काम करण्यात तयार झाले आहेत.

यावेळी काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, काँग्रेस नेते विनोद अहिरकर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना प्रतिनिधी सुधाकर अडबाले, हरीश ससनकर, विजय भोगेकर, प्रमोद मगरे, श्याम लेडे, कालिदास येरगुडे, श्रीहरी शेंडे, राजू लांजेकर, अमोल खोब्रागडे, अरुण बावणे, प्रकाश कुमरे, विलास बोबडे, नागेश सुखदेवें, निलेश कुमरे, अमोल देठे, उमाजी कोडापे, होमेन्द्र मेश्राम, सुरेंद्र अडबाले, सुनील ढोके, संजय पडोळे हे विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते

माझे कुटुंब माझी जबाबदारी या कामावर जिल्ह्यातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व 14 प्राथमिक शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकण्याचे निवेदन दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला दिले होते, त्यात अपुऱ्या सुविधा व फक्त शिक्षकांना या कामाला जबरीने जुंपणे तसेच कोणतेही लेखी आदेश न देता कामाची सक्ती करणे हे व अन्य विषय होते. त्यामुळे या कामावर मोठा परिणाम झाला होता त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी कक्षात  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,  खासदार खासदार बाळू धानोरकर व संघटना प्रतिनिधी यांच्या समवेत सविस्तर चर्चा घडून आली. चर्चेतील मुद्दे शासननिर्णय मध्ये उल्लेख नसल्याने शिक्षकांना हे काम देऊ नये. या मागणीवर सध्या अन्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने व आपत्ती व्यवस्थापन मध्ये गरज असल्याने शिक्षकांना सेवेत घेतले आहे करिता कार्य करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले,

मागण्यांमध्ये या कार्याचा स्वतंत्र आदेश देण्यात येईल, सोबतीला उपलब्ध कर्मचाऱ्यांची टीम देण्यात येईल, मास्क, सॅनिटायझर फेस शिल्ड हे देण्यात येईल, सर्व आस्थापणेतील कर्मचाऱ्यांचा समावेश कार्यासाठी करण्यात येईल, 50 वर्षावरील, अपंग, गंभीर आजार, गर्भवती, स्तनदा माता यांना सूट देण्यात येईल, शाळेच्या कार्यक्षेत्रातच कामे देण्यात येतील, सेवा देतांना कोविड ची लागण झाल्यास शासकीय दवाखान्यात बेड राखीव ठेवण्यात येईल व सोय नसल्यास खाजगी मध्ये उपचाराच्या खर्चाची व्यवस्था करण्यात येईल. शिक्षकांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात येईल. गावात तणाव असल्यास संरक्षण व टीम पाठवण्यात येतील. बिएलओ व ही कामे यापैकी सध्या ही कामे करावीत बिएलओ ची कामे काही दिवसानंतर करण्याच्या सूचना दिल्या जातील, जास्त लोकसंख्या असलेल्या गावात जास्त टीम देण्यात येतील, शिक्षक व संघटनांचे म्हणने एकूण न घेणाऱ्या तालुका प्रशासनाला समज देण्यात येईल. शिक्षकांच्या नव्वद टक्के मागण्या मान्य झाल्यामुळे हे काम करण्याचे शिक्षक संघटनांनी यावेळी मान्य केले.

.कोविड – १९ मध्ये कार्यरत शिक्षकांना ५० लाखाचे विमा सुरक्षा कवच द्या : खासदार बाळू धानोरकर

कोरोना कामी ड्यटीवरील शिक्षकांना ५० लाखाचे विमा सुरक्षा कवच द्यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे खासदार बाळू धानोरकर यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here