माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे काम प्राथमिक शिक्षकांना देऊ नये

चंद्रपूर,28 सप्टेंबर:
कोविड 19 अंतर्गत सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवणे सुरू आहे यात सर्व्हे करण्याचे काम शासन परिपत्रकात नमूद नसतानासुद्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात देण्यात आले आहे. आधीच कोविड ची अन्य कामे व शैक्षणिक कार्य असल्यामुळे सदर काम शिक्षकांना देऊ नये अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.
कोविड 19 अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या मोहिमेच्या शासन परिपत्रकात शिक्षकांना हे काम द्यावे असा अजिबात उल्लेख नाही, गावातील 2 स्वयंसेवक व अन्य आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचारी या टीम मध्ये घ्यावे असे नमूद असतांना सरसकट जिल्ह्यातील फक्त जिल्हा परिषदांच्या शिक्षकांना या कामाचे आदेश देण्यात आले आहे हा मोठा अन्याय आहे. आधीच कोविड सर्व्हे, कंटेन्मेंट झोन मधील कामे, विलगिकरन कक्ष देखभाल अशी कामे शिक्षकांच्या मागे आहेतच त्यातच ऑनलाईन व ऑफलाईन शैक्षणिक कार्य सुद्धा करायचे आहे, नुकत्याच आलेल्या शासन निर्देशात आठवडी अहवाल सुद्धा शिक्षकांना द्यायचा आहे त्यामुळे अशी कामे असल्यास कसेबसे शिक्षण पोहोचत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होणार आहे.
करिता जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी हे काम शिक्षकांकडून काढून घ्यावे व पुढील कोविड कामे देतांना पुढील अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करूनच द्यावीत अशी भूमिका घेतली आहे. यात प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येकाला स्वतंत्र आदेश द्यावा, प्रत्येकी 50 लाखाचा विमा असल्याचा आदेशात उल्लेख करावा, 50 वर्षावरील, अपंग, गंभीर आजारी, स्तनदा माता, गर्भवती स्त्रिया यांना कामातून वगळावे, मास्क सॅनिटायझर व आवश्यक सुरक्षा किट रोज पुरवावी, ऑनलाईन माहिती भरण्याचे काम देऊ नये दिल्यास साधने उपलब्ध करावीत, सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश टीम मध्ये करावा, एकाच शिक्षकाला वर्षभर काम देऊ नये, आळीपाळीने सर्व शिक्षकांना द्यावे, एका शाळेतील एकच शिक्षक घ्यावे म्हणजे शैक्षणिक प्रक्रियेला बाधा येणार नाही, सेवा देतांना कर्मचारी बाधित झाल्यास उपचार खर्च करावा, कामे देताना शाळेच्या कार्यक्षेत्रातच द्यावी, अनेक गावांत प्रवेश बंदी, शिवीगाळ, मारझोड होनार आहे तेव्हा संरक्षण पुरवावे, मागील 6 महिन्यापासून कोविड ची विविध कामे करीत असल्यामुळे कोविड योद्धा म्हणून शिक्षकांचा सन्मान व्हावा इत्यादी आवश्यक सूचनांचा विचार व्हावा अन्यथा प्राथमिक शिक्षक या मोहिमेवर बहिष्कार टाकतील याची नोंद घ्यावी असे आवाहन संघटनेच्या वतीने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, विजय भोगेकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष कालिदास येरगुडे, ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्याम लेडे, प्रहार शिक्षक संघटनेचे अमोल खोब्रागडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विलास बोबडे, अमोल देठे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे उमाजी कोडापे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राजकुमार वेल्हेकर, राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राजू लांजेकर, संजय पडोळे, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अरुण बावणे, ग्रेड मुख्याध्यापक संघटनेचे सुरेश वासेकर, पदवीधर शिक्षक महासंघाचे प्रकाश कुमरे, विवेक वल्लपकर, अपंग कर्मचारी संघटनेचे राजू दर्वे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सुनील ढोके, ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे उमेश कुकुडकर, पदवीधर व केंद्रप्रमुख महासंघाचे ओमदास तुराणकर यांनी केले आहे यावेळी शिक्षक संघटना पदाधिकारी निखिल तांबोळी, मनोज बेले, होमेन्द्र मेश्राम, सुनीता इटनकर, माधुरी निंबाळकर, नरेंद्र गेडाम, राजेश धानोरे हे निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here