WhatsApp व्हिडीओ कॉलवरून अनोळखी महिलेकडून ब्लॅकमेलिंगचे प्रकार !

चंद्रपूर : कोरोनामुळे नागरिक मानसिक विवंचनेत आहेत. त्यातच काही उपद्रव्यांकडून लैंगिकरित्या छळवणूक करून ब्लॅकमेलिंगचे प्रकारात वाढ होत असल्याचे दिसते. महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूरात ही असे प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची सूरूवात अशी होते : मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, Facebook वर सुंदर प्रोफाईल पिक्चर असलेल्या अनोळखी महिलेकडून फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविल्या जाते. फ्रेन्ड्स रिक्व्टेस्ट एक्सेप्ट झाल्यानंतर फेसबुक मॅसेंजरवरून मैसेजच्या माध्यमातून बातचीत ला सुरूवात करून मोबाईल क्रमांक मागितल्या जातो आणि त्यानंतर नियोजनानुसार फसवणुकीला सुरूवात होते.

अशी घडते घटना :- मग त्याच अ(?)नोळखी महिलेद्वारे पूरूषाला व्हिडीओ कॉल केल्या जातो. ती महीला व्हिडीओ कॉलदरम्यान स्वत:चे कपडे उतरविते व समोरच्या व्यक्तीला ही कपडे उतरविण्यास भाग पाडते. त्यानंतर हे वेबकॅम कॉल /व्हॉटसअॅप कॉल रेकॉर्ड केले जातात आणि गुन्हेगार त्यांना सामायिक (viral) करण्याची धमकी देतात. मागेल तेवढे पैसे दिले नाही तर ते न्युड व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देवुन आर्थिक शोषण करतात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांत काही महीला अपराधी काम करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूरातही असे प्रकार घडले असून बदनामीच्या भीतीने नागरिक सामोरे येण्यास घाबरत आहेत. यासंबंधात मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील ही गुन्हेगारी टोळी असून या टोळीमध्ये महिलांचा समावेश आहे. यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असून नागरिकांनी न घाबरता पोलिसांसमोर यावे असे आव्हान पोलीस विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी अश्या प्रकारात नागरिकांनी जागरूक राहण्याची आव्हानही केले होते.

सोशल मिडिया चा वापर जपून करण्याचे जिल्हा सायबर पोलिसांचे आवाहन !

सद्यस्थितीत सोशल मिडीया फेसबुक वर चालणाऱ्या विविध ट्रेंड अंतर्गत कपल चॅलेंज, फैमिली चॅलेज, सिंगल चॅलेज असे वेगवेगळे चॅलेंज स्वीकारुन बरेच लोक स्वत:चे व आपल्या कुटूंबियांचे फोटो सोशल मिडीयावर अपलोड करीत आहेत परंतु सोशल मिडियावर सुरु झालेल्या या ट्रेंड चा सायबर गुन्हेगारांना संधी मिळुन चॅलेज चे नावाखाली हजारो दाम्प्यांचे फोटो त्यांना सहज उपलब्ध झाले असुन अशा गुन्हेगारांकडुन फोटोमध्ये छेडछाड करुन किंवा मार्फ करुन त्यास अश्लील स्वरूप देवुन संबंधीतांचे नातेवाईक किंवा मित्रांना पाठवून ब्लकमेलींग चा प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. अश्या स्वरूपाचे अनेक गुन्हे याआधीच घडले असुन त्यामध्ये बरेच लोकांचं दाम्पत्य
जिवन उध्वस्त होवून त्यांच्यात वाद निर्माण होवून कौटूंबिक आयुष्य उध्वस्त होत आहेत. त्याच प्रकारे व्हॉटसअप या सोशल मिडियावर सुध्दा अनोळखी सुंदर मुलीचा विडीओ कॉल येवून त्यात तिचे अश्लील विडीओ दाखवुन लोकांना ब्लॅकमेल करीत असल्याचे घटना सुध्दा घडत आहे.
सोशल मिडीयाचा वापर जपून करावा. अशा ट्रेंड अथवा चेलेंज निश्चित कोणी तयार केले ? त्याचं मुळ प्लॅटफॉर्म काय आहे? याबाबत काही माहिती सोशल मिडीयावर उपलब्ध नाही. त्यामुळे अशा ट्रेंड अथवा चॅलेजला बळी पळुन स्वत:चे विशेषतः पत्नी, मुलीचे फोटो अपलोड करु नये. जर अशा प्रकारे कोणी  ब्लैकमेल करीत असेल तर तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये जावून तकार नोंदवावी. पोलीस विभाग नेहमीच आपल्या सेवेसाठी तत्पर आहे, असे आवाहन सायबर पोलीस ठाणे चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस नायक मुजावर अली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here