शुक्रवारी आणखी पाच बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 25 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 202 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 911 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 5 हजार 193 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3 हजार 583 आहे.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, बाबुपेठ, चंद्रपूर येथील 61 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 2 सप्टेंबरला क्राइस्ट हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते.
दुसरा मृत्यू चंद्रपूर शहरातील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तिसरा मृत्यू बल्लारपूर येथील 42 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 23 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
चवथा मृत्यू सिस्टर कॉलनी परीसर, चंद्रपूर येथील 42 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 23  सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तर, पाचवा मृत्यू  कोठारी, बल्लारपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 23 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. वरील पहिला मृत्यू झालेल्या बाधितेला कोरोनासह मधुमेह असल्याने क्राइस्ट हॉस्पिटल येथे मृत्यू झालेला आहे. तर, अनुक्रमे दोन ते पाच मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 135 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 128, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 94 बाधित, पोंभूर्णा तालुक्यातील 5, बल्लारपूर तालुक्यातील 11, चिमूर तालुक्यातील 2, मूल तालुक्यातील 4, गोंडपिपरी तालुक्यातील 1, जिवती तालुक्यातील 1, कोरपना तालुक्यातील 4, ब्रह्मपुरी तालुक्यातील 20, नागभीड तालुक्यातील 7,  वरोरा तालुक्यातील 10, भद्रावती तालुक्यातील 3, सावली तालुक्यातील 3,  सिंदेवाही तालुक्यातील 19, राजुरा तालुक्यातील 15, यवतमाळ येथील 2, तर गडचिरोली येथील एक असे एकूण 202  बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहर व परीसरातील ऊर्जानगर, रेल्वे कॉलनी परिसर, बाजार वार्ड, सरकार नगर, सिंधी कॉलनी परिसर, स्नेह नगर, वडगाव, घुग्घुस, संजय नगर, अशोक नगर, कृष्णा नगर, भिवापुर वॉर्ड, पठाणपुरा वार्ड, नगीनाबाग, भिवापूर वार्ड, साळवे कॉलनी परिसर, जल नगर वार्ड, सिस्टर कॉलनी परिसर, सिद्धार्थ नगर, भानापेठ वार्ड, छोटा बाजार परिसर, बालाजी वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील शिव नगर वार्ड, टिळक वार्ड, गौरक्षण वार्ड, श्रीराम वार्ड, बालाजी वार्ड, परिसरातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील  वडाळा पैकु परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
मुल तालुक्यातील मारोडा परिसरातून बाधीत ठरले आहे. राजुरा तालुक्यातील रामपूर, बामणवाडा, सोमनाथपूर, गौरी कॉलनी परिसर, सास्ती, दोहेवाडी वार्ड, चुनाळा, टिचर कॉलनी परिसर, बाजार वार्ड भागातून बाधीत पुढे आले आहे.वरोरा तालुक्यातील निमसडा, शेगाव, आशीर्वाद लेआऊट परिसर, विवेकानंद वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.
नागभीड तालुक्यातील शिवाजी चौक, झेंडा चौक तळोधी, सुलेझरी, गोविंदपुर, राम मंदिर चौक परिसर, चावडेश्वरी चौक भागातून बाधित पुढे आले आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील पेठ वार्ड, भवानी वार्ड, माहेर खरबी, टिळक नगर, शांती नगर, पटेल नगर, संत रविदास चौक परिसर, शेष नगर परिसरातून बाधित ठरले आहे.
कोरपना तालुक्यातील एसीडब्ल्यू कॉलनी परिसर, नांदाफाटा भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगर, गौतम नगर, भोज वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील बामणी, नवरगाव, पळसगाव, काचेपार, गजानन नगर, सलीम नगर, सुभाष वार्ड भागातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील व्याहाड भागातून बाधित ठरले आहे. पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here