छायाचित्र मतदार याद्यांची अंतीम यादी मतदारांच्या अवलोकनार्थ उपलब्ध

चंद्रपूर दि. 24 सप्टेंबर: 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार संघाच्या अद्ययावत  छायाचित्र मतदार यादीच्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमानुसार चारही विधानसभा क्षेत्राच्या छायाचित्र मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येत  आहेत. मतदारांच्या अवलोकणार्थ त्या याद्या प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध असणार  आहेत.

जिल्ह्यातील 70- राजुरा71- चंद्रपूर(अ.जा.)72- बल्लारपूर,73- ब्रह्मपुरी,74- चिमूर व 75- वरोरा या सहा विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार याद्या दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 

मतदार संघाच्या छायाचित्र मतदार याद्या या ठिकाणी उपलब्ध:

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रजिल्ह्यातील सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालयेजिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालये तर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयात सदर याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व मतदारांनी याची नोंद घ्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here