
चंद्रपूर,24 सप्टेंबर:
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं त्यावर नियंत्रणासाठी शुक्रवार 25 सप्टेंबर ते गुरुवार 1 ऑक्टोबर पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यू लावण्याचे निर्णय जिल्हा प्रशासन,लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनेच्या सोमवार 21 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जनता कर्फ्यूला साथ देत चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) 25 ते 28 सप्टेंबर या चार दिवसांकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात एपीएमसी मार्केटमधील अन्नधान्य, भाजी, फळ, कांदा-बटाटा, मसाला मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे.
यासंदर्भात काल,बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांच्या अध्यक्षतेत बाजार समितीत बैठक झाली.या बैठकीत मार्केट 25 ते 28 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.