खाजगी जम्बो कोविड सेंटरमध्ये ५० टक्के बेड गरिबांसाठी आरक्षीत ठेवा – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर:कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चंद्रपूरात ७०० खाटांचे खाजगी जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने परवाणगी देण्यात आली आहे. मात्र सर्व सामान्य कुंटूबातील रुग्णांना या कोविड सेंटरमधील उपचार न परवडण्यासारखा आहे. त्यामुळे अशा संकटाच्या परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करत या जम्बो कोविड सेंटरमधील ५० टक्के खाटा गरिबांसाठी आरक्षीत ठेवण्यात याव्यात, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना केल्या असून या आरक्षीत बेडचा खर्च महानगर पालिकेने दयावा तर या बेडवर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या औषधांचा खर्च आमदार निधी, खनीज विकास निधीच्या माध्यमातून आम्ही करू असेही आ. जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातून म्हटले आहे.

चंद्रपूर जिल्हात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. याचा परिणाम आरोग्य विभागावर झाल्याचे जाणवत आहे. असे असले तरी रुग्णांना योग्य उपचार मिळावा यासाठी प्रशासनाला आवश्यकतेनूसार योग्य सूचना दिल्या जात आहे. मात्र या संकटाशी लढण्यात सर्व शासकीय यंत्रणांच्या योगदानाची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाचीही या परिस्थिशी लढतांना महत्वाची भुमीका असली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्वसमावेशक निर्णय घेत सर्व समाजातील सर्व घटकांचा विचार केला पाहिजे. असे आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातून म्हटले आहे.

चंद्रपूरातील गंभिर परिस्थिवर मात करण्यासाठी खाजगी ७०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्याची परवानगी महानगर पालिकेने दिली आहे. मात्र हि परवानगी देत असतांना सर्व सामान्यांचा विचार केला जाणे अपेक्षीत होते. या खाजगी कोविड रुग्णालयात गरिब कुटुंबातील रुग्णांना उपचार घेणे शक्य आहे का याचाही विचार केला गेला पाहिजे. त्यामूळे सर्व सामान्य कुटुबातील रुग्णांचा विचार करत या जम्बो कोविड सेंटरमध्ये ५० टक्के खाटा या गरिबांसाठी आरक्षीत ठेवण्यात यावा अशी सूचना आ. जोरगेवार यांनी केली आहे. या आरक्षीत खाटांचा पूर्ण ताण महानगर पालिकेवर पडू नये यासाठी येथील रुग्णांच्या औषाधांचा खर्च विविध निधीच्या माध्यमातून आपण करणार असेही जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातून स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here