चोरांनी भररस्त्यावरील मेडिकलचं फोडले !

चंद्रपूर,17 सप्टेंबर:स्थानिक रामनगर ही चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध वस्ती आहे. रामनगर चौकामधून दाताळा रोडकडे जाताना विदर्भ हाऊसिंग कॉलोनी चौक पडतो, त्याच भरवस्तीतील चौकात शिवम मेडिकल स्टोअर्स मध्ये 17 सप्टेंबरच्या पहाटे साडेतीनच्या दरम्यान मिसुरडे भी न आलेल्या काही मुलांनी पहाटेच्या दरम्यान शटर तोडून दहा हजार नगदी लंपास केले, ही चोरी कितीची झाली हे महत्त्वाचे नाही परंतु भर वस्तीमध्ये झालेली चोरी पोलिसांना खुले आव्हान आहे.आजच्या स्थितीमध्ये संचारबंदी आहे, पोलिसांचा तगडा पहारा आहे. सामान्यजनांना कामाने बाहेर निघायला भीती वाटते, अशा स्थितीमध्ये अल्पवयीन असलेले हे मुले एखाद्या भरवस्तीत दुकान फोडतात, ही फार लज्जास्पद अशी बाब आहे आणि चंद्रपूर जिल्हा पोलिस साठी तर हे खुले आव्हान आहे. सामान्यजनांची रक्षा करण्याची जबाबदारी आज पोलिस विभागावर आहे. भर वस्तीतील एखादे दुकान फुटते तर सामान्य माणूस आपल्या घरी तरी आज सुरक्षित आहे कां? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ढंगाने मिशी न आलेली आजची युवा पिढी व्यसनाधीन झाली आहे, त्यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला पोलीस विभाग मात्र आपल्याच तोऱ्यात आहे, असेच आजचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here