कोरोनाबळीचे सत्र सुरुच; आज आणखी पाच बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 13 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील गेल्या 24 तासात 290 बाधित आढळून आल्याने आत्तापर्यंत कोवीड संक्रमित झालेल्या बाधितांची  संख्या 5 हजार 858 झाली आहे. आतापर्यंत 3 हजार 261 बाधित कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या 2 हजार 526 बाधित उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पाच मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये, शिवाजी नगर, खेड ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
दुसरा मृत्यू बामणवाडा राजुरा येथील 52 वर्षीय महिला बाधितेचा  झाला आहे. या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
तिसरा मृत्यू नगीना बाग, चंद्रपुर येथील 37 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 4 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
चवथा मृत्यू वणी यवतमाळ येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 7 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 12 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.
तर, पाचवा मृत्यू बिकली नागभिड येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह  न्युमोनिया, हृदयविकाराचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 71 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 64, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर  शहर व परिसरातील 135, चिमूर तालुक्यातील 12, पोंभूर्णा तालुक्यातील 7, बल्लारपूर तालुक्यातील 33, ब्रह्मपुरी तालुक्यातील 23, भद्रावती तालुक्यातील 13, मूल तालुक्यातील 2, राजुरा तालुक्यातील 9, वरोरा तालुक्यातील 12, सावली तालुक्यातील 17, सिंदेवाही तालुक्यातील 14, कोरपणा तालुक्यातील 2, गोंडपिपरी तालुक्यातील 3, नागभीड तालुक्यातील 6, वणी- यवतमाळ, वडसा-गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे एकूण 290 बाधित पॉझिटिव्ह ठरले आहेत.
या ठिकाणी आढळले चंद्रपूर शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील तुकूम, वाघोबा चौक, दुर्गापुर, मारडा, रामनगर, रयतवारी, अंचलेश्वर वार्ड, भानापेठ, जुनोना, जीएमसी परिसर, बाबुपेठ, कपिल चौक, कोतवाली वार्ड, पठाणपुरा वार्ड, गंजवार्ड, मोरवा, बालाजी वार्ड, वडगाव,‌ उत्तम नगर, अशोक नगर, बाजार वार्ड, भिवापूर वार्ड, श्याम नगर, गणेश नगर तुकुम, हनुमान मंदिर चौक, बापट नगर, विठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.
तालुक्‍यातील या ठिकाणी आढळले बाधीत:
ब्रह्मपुरी तालुक्यातील फुले नगर, बालाजी वार्ड,  मालडोंगरी, वाल्मिक नगर, आवळगाव, संताजी नगर, गांगलवाडी, विद्या नगर, कमला नगर परिसरातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील निमगाव, व्याहाळ बु, लोढोली भागातून बाधित पुढे आले आहेत. मूल तालुक्यातील राजगड, बोरचांदली भागातून बाधित ठरले आहेत.
वरोरा येथील पद्मालय नगर, अभ्यंकर वार्ड, बोर्डा, पोलीस स्टेशन परिसर, एकार्जूना परिसरातून बाधित ठरले आहेत. पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द भागातून बाधित पुढे आले आहेत. राजुरा तालुक्यातील सोमनाथ पुर, चुनाभट्टी वार्ड, बामणवाडा परिसरातून बाधित ठरले आहेत. नागभीड तालुक्यातील तलोधी, राम मंदिर चौक भागातून बाधित पुढे आले आहेत.
बल्लारपूर तालुक्यातील कन्नमवार वार्ड, विवेकानंद वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, गांधी वार्ड, डॉ.झाकीर हुसेन वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, भागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. चिमूर तालुक्यातील शंकरपुर, गुरुदेव वार्ड, गांधी वार्ड, नेहरू वार्ड भागातून बाधित पुढे आले आहेत.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. भद्रावती येथील पंचशील नगर, एकता नगर, नवीन सुमठाणा भागातून बाधित पुढे आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here