चंद्रपूर शहरातील 120 सह 24 तासात आढळले 190 नवे बाधित

चंद्रपूरदि. 10 सप्टेंबर: जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 190 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 852 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 239 असून आतापर्यंत 2 हजार 557 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 24 तासांमध्ये तीन बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्येअंचलेश्वर वॉर्ड चंद्रपुर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यू तुकुम चंद्रपूर येथील 58 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 6 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 9 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तरतिसरा मृत्यु नगीना बाग चंद्रपुर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 56 बाधितांचा मृत्यू झालेला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 52, तेलंगाणा एकबुलडाणा एक व गडचिरोली दोन बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 120, सावली तालुक्यातील 2, बल्लारपूर तालुक्यातील 11,  ब्रह्मपुरी तालुक्यातील 5, मूल तालुक्यातील 17, राजुरा तालुक्यातील 7, वरोरा तालुक्यातील 2, कोरपना तालुक्यातील 1, भद्रावती तालुक्यातील 5, पोंभूर्णा तालुक्यातील 10, नागभीड तालुक्यातील 2,सिंदेवाही तालुक्यातील 5, चिमूर तालुक्यातील 2, वणी- यवतमाळ येथून आलेला 1 असे एकूण 190 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले चंद्रपूर शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ वार्डसुमित्रा नगर तुकुममहाकाली काॅलरी परिसरगुरुद्वारा परिसरअष्टभुजा वार्डदवा बाजार नगीना बाग परिसरसराई वार्डदाताळासिस्टर कॉलनी परिसरघुटकाळा वार्डहरी ओम नगरबाबुपेठ वार्डरामनगर भागातून बाधित पुढे आले आहे.

तालुक्यातील या ठिकाणी आढळले बाधित:

मूल तालुक्यातील चितेगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सावली तालुक्यातील व्याहाड खुर्दपारडी भागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील सास्ती कॉलनी परिसरबामनवाडा परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील कळमनाकोठारी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणाशिवाजी वार्डजुना सुमठाणापरिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील नेहरू वार्डखडसंगी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here