श्री.वसंतराव जवळे (गुरुजी) यांचे निधन

चंद्रपूर:6 सप्टेंबर

श्री. वसंतरावजी जवळे(गुरुजी) यांचे आज दिनांक ६/९/२०२० रोजी सकाळी वयाच्या 81 व्या वर्षी दुःखद निधन झाले.

वसंतराव जवळे(गुरुजी) यांनी वयाचा फार कमी वयापासून शिक्षकाची नौकरी पत्करली होती. नौकरी करून पुढे ते बी.एड. उत्तीर्ण झाले व लोकमान्य टिळक विद्यालयात मुख्यध्यापक होते. ते सुरवातीपासूनच काँग्रेसचे निष्ठावंत होते.काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी खासदर नरेशबाबू पुगलिया यांच्या सोबत युवक काँग्रेस व जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून बरेच वर्ष काम केले.एक निस्वार्थ भावनेने सेवा करणारा सक्षम शिक्षक व सामाजिक, राजकीय कार्यकर्ते ते होते. स्वभावाने अत्यंत मन मिळवू व सर्वांशी प्रेमाने वागणारे असे व्यक्तीमत्व त्यांचे होते. जवळे गुरुजी यांचे जिल्ह्याच्या शिक्षण,सामाजिक व राजकीय क्षेत्रात फार मोठे योगदान राहिले.आजपर्यंत ते दि एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून काम पाहत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here