माजी मुख्यमंत्र्यांच्या ‘तो’ शब्द मी पूर्ण करणार : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : मागील सरकारने अनेक लॉलीपॉप जनतेला दिले. निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासनाच्या बाजार मांडला होता. चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर शहर वायफाय शहर करणार अशी घोषणा केली होती. परंतु जवळपास चार वर्ष लोटून देखील शब्द पूर्ण करू शकले नाही. हा शब्द मी पूर्ण करणार असून प्रस्ताव आठवड्याभरात पूर्ण करण्याच्या सूचना दूरसंचार सलाहकार समितीच्या बैठकीत अध्यक्ष स्थानी असलेल्या खासदार बाळू धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.

आज दूरसंचार सलाहकार समितीची बैठक घेण्यात आली त्यामध्ये अध्यक्षस्थानी खासदार बाळू धानोरकर हे होते. यावेळी महाप्रबंधक अरविंद पाटील, सह महाप्रबंधक वि. के. फाये, मंडळ अभियंता सचिन सरोदे, समिती सदस्य दिपक काटकोजवार, प्रवीण महाजन, आतिफ शब्बार अहमद कुरेशी यांची उपस्थिती होती.

यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बी. एस. एन. एल विभागाच्या आढावा घेतला. त्यामध्ये अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. बी. एस. एन. एल आधी घराघरात प्रत्येकांकडे वापरले जात होते. मात्र आता कालांतराने वापर कमी होत आहे. भविष्यात इतिहास जमा न होता येत्या काळात  बी. एस. एन. एल चे जुने दिवस परत आणण्याकरिता काम करा, अनेक ठिकाणी खोदकाम सुरु असते यामध्ये तारा तुटल्यास अनेक दिवस सेवा खंडित होत असतात. त्यामुळे तारा दर्शविणारे फलक लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. खासगी दूरसंचार कंपनीला स्पर्धक ठरण्यासाठी  बी. एस. एन. एल  अद्याप २ जी व ३ जी सर्विस देत आहे. दुसरीकडे खाजगी कंपनी ४ जी व ५ जी कडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला  बी. एस. एन. एल  कमी पडताना दिसत आहे. परंतु हे चित्र फार फाईट असून येत्याकाळात हे चित्र बदलविण्याकरिता  बी. एस. एन. एल मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोकरी म्हणून काम न करता जणसेवा म्हणून काम केल्यास निश्चित चित्र बदलणार अशी अशा खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली. अत्याधुनिक यंत्रसामुगीच्या वापर करून खासगी कंपन्यांना स्पर्धेत मागे टाकण्याच्या सूचना त्यांनी केल्यात.

दुसरीकडे राजकारण करताना मागील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त आश्वासनाच्या पाऊस व निवडणुकीच्या काळात गाजर दाखविण्याचे काम केले होते. चंद्रपूर शहर महानगर पालिका निवडणुकीत चंद्रपूर शहर वायफाय शहर कारण्याची घोषणा केली होती. त्यावर विश्वास ठेवीत चंद्रपूर येथील नागरिकांनी घवघवीत मतदार करत भारतीय जनता पार्टीला मते देऊन अनेक नगरसेवक विजयी केले होते. मात्र चार वर्ष लोटून देखील तो शब्द पूर्ण केला नाही. हा चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या अपमान आहे. त्यामुळे हा शब्द मी पूर्ण करणार असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here