

ब्रम्हपुरी : गोसीखुर्द धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पुराचे पाणी झपाट्याने वाढत असल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे आज आप च्या नेत्या अॅड.पारोमीता गोस्वामी यांनी पुरग्रस्त गावांना भेटी दिल्या त्यांच्या सोबत सावली तालुका प्रमुख श्री अनिल मडावी सिंदेवाही तालुका प्रमुख श्री. शशिकांत बदकमवार तसेच आदिवासी आघाडी प्रमुख जितेंद्र पेंदाम होते व तेथील परिस्थिती जाणुन घेतली.
25 वर्षानंतर हा मोठा महापूर असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. यापूर्वी सन 1994 मध्ये वैनगंगा नदीला महापूर आला होता यात मोठी हानी झाली होती.
गोसीखुर्द धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने धरणाचे पाणी विसर्ग होण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले आहेत. वैनगंगा नदीचे पाणी वेगाने वाढत असल्याने नदी तीरावरील गावात पूर परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे .पुराच्या पाण्याने नदी काठावरील गावा सभोवताल वेढा घातल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असल्याने धान पीक, भाजीपाला पिकांचे पूर्णता नुकसान झालेले असून जीवनावश्यक वस्तूचे ही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे .ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज, खरकाडा (पिंपळगाव ),बेळगाव गावांचा तालुक्याची संपर्क तुटलेला असून बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे पिंपळगाव भोसले, अर्हेर-नवरगांव, रनमोचन, खरकाडा, बरडकिन्ही,बेटाळा, पारडगाव, बोळेगाव गावात पाणी शिरलेल आहे . ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव, बेटाळा,किन्ही आवळगाव, बेलगाव- कोल्हारी, मालडोंगरी – ब्रह्मपुरी मार्गा वरील पुलावर पाणी चढल्याने ही मार्ग बंद पडले आहेत. नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य सुरू आहे.
आठ दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे धान पीक बुडाली होती आता पुन्हा आलेल्या पुरामुळे धान पिक बुडाली असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले.तसेच घरातील औषधी अन्नधान्य पुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे प्नचंड नुकसान झाले.कोरोना महामारी संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू शकतो.
झालेल्या हानीचा तात्काळ पंचनामा करून त्वरित मदत देण्याची मागणी जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे यांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
निवेदन देताना श्री.सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष, श्री.भिवराज सोनी कोषाध्यक्ष,, श्री संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, श्री मयूर राईकवार माजी जिल्हा संयोजक श्री संदीप बिसेन युवा सहसंयोजक, श्री राजेश
चेडगुलवार जिल्हा सोशल मीडिया प्रमुख ,श्री.योगेश आपटे उपाध्यक्ष महानगर, श्री राजू कुडे महानगर सचिव , सिकंदर सागोरे महानगर कोषाध्यक्ष, पंकज रत्नपारखी, अमजद भाई ऑटो संघटन, शंकर धुमाळे ऑटो संघटन, दिलीप तेलंग
सह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.