आठव्यादिवशीही जिल्ह्यात सर्वाधिक बाधित चंद्रपूर शहरातील

चंद्रपूर दि. 26 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1667 झाली आहे. यापैकी 1 हजार 68 बाधित बरे झाले आहेत तर 579 जण उपचार घेत आहेत. 24 तासात एकूण 96 बाधित पुढे आले आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 52 वर्षीय चामोर्शी गडचिरोली येथील पुरुषाचा  25 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार तसेच न्युमोनिया  होता. 19 ऑगस्टला रात्री भरती करण्यात आले होते. या बाधिताच्या मृत्यूची नोंद जिल्ह्यात होणार नसल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

तर दुसरा मृत्यू राणीलक्ष्मी वार्ड बल्लारपूर येथील 55 वर्षीय महिलेचा झाला आहे. या महिलेला कोरोना व्यतिरीक्त न्युमोनिया  होता. 25 ऑगस्टला सकाळी 7.10 वाजता भरती करण्यात आले तर उपचारादरम्यान आज 26 ऑगस्टला पहाटे 12.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या 20 आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 17 तर तेलंगाणा, बुलडाणा आणि गडचिरोली येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरात सर्वाधिक 36 बाधितांचा समावेश आहे. याचबरोबर गोंडपिपरी 3, बल्लारपूर 14, राजुरा 3, मुल 17, नागभीड 4, जिवती 6, वरोरा 5, कोरपना 2 , वनी यवतमाळ येथून आलेले 2, भद्रावती 3 तर सावली  येथील एका बाधिताचा समावेश असुन असे एकूण 96 बाधित पुढे आले आहे.

चंद्रपूर शहरातील घुटकाळा, महादेव मंदिर वार्ड, श्रीराम वार्ड, जटपुरा गेट, दाद महल, अंचलेश्वर गेट, भिवापुर वॉर्ड, आंबेडकर नगर बाबुपेठ, बंगाली कॅम्प, विठ्ठल मंदिर वार्ड, आकाशवाणी रोड परिसर, रेल्वे कॉलनी परिसर, नगीना बाग, रयतवारी, बेलेवाडी, सिव्हिल लाईन, इंदिरानगर, रहमत नगर तसेच तालुक्यातील वडगाव, दुर्गापूर येथील पॉझिटिव्ह ठरले आहेत.

बल्लारपूर येथील पंडित दीनदयाल वार्ड, जय भिम चौक, बालाजी वार्ड, किल्ला वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, बील्ड न्यू कॉलनी, कन्नमवार वार्ड तर तालुक्यातील दहेली, विसापूर येथील बाधित पुढे आले आहेत.मुल येथील वार्ड नंबर 16, तर तालुक्यातील चिंचाळा, फिस्कुटी, कांतापेठ भागातील बाधित ठरले आहेत.

जिवती येथील वार्ड नंबर 15, 16 येथील पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. कोरपणा येथील एसीडब्ल्यू कॉलनी आवारपूर परिसरातील बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी शहरातील तर तालुक्यातील आर्वी भागातील बाधित पुढे आले आहेत. राजुरा शहरातील तर तालुक्यातील गोवारी भागातून बाधित ठरले आहेत. नागभीड तालुक्यातील सावरगाव गावातून बाधित पुढे आले आहेत. वरोरा शहरातील कर्मवीर वार्ड तर तालुक्यातील चिकणी गावातील बाधित ठरले आहेत. भद्रावती विरुर स्टेशन, सावली तालुक्यातील कारगाव, वणी यवतमाळ येथील बाधित पुढे आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here