
चंद्रपूर:२५ ऑगस्ट
चंद्रपूर शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसतोय.सध्या चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास १५०० कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे.कोरोनाच्या रुपात खूप मोठे संकट समोर उभा आहे ही बाब नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. चंद्रपूर येथील गंजवार्ड परिसरातील सरदार पटेल महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आज एकच गर्दी केली.
महाविद्यालया मार्फत विद्यार्थ्यांच्या आरोग्याला लक्षात घेता योग्य ती सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसुन आले नाही.प्रवेश प्रकियेसाठी महाविद्यालयात होणारी अपेक्षित गर्दी बघता विद्यार्थ्यांना विशिष्ट अंतरावर उभे राहण्यासाठी खुणा तयार करणे किंवा इतर काही व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र अशी काही व्यवस्था महाविद्यालय तर्फे करण्यात आली नाही.
महाविद्यालयाने जरी सोशल डिस्टनसिंग करिता खुणा तयार केल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांना हे पाळणे गरजेचे आहे.आता सोशल डिस्टन्सिंगकडे स्थानिक प्रशासन गंभीरपणे लक्ष देणार का ? की हा असाच प्रकार पुढे सुद्धा सुरुच राहील ? असा प्रश्न निर्माण झालाय.
सध्या चंद्रपूर शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्यात वाढत आहेत.अशात नागरिकांसह प्रशासनानेसुद्धा या बाबींकडे गंभीररित्या लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.