हमारी पहचान” महिला सक्षमीकरणा करिता ह्यूमन मल्टीपर्पज असोसिएशनचे नवे उपक्रम

चंद्रपूर :- महिला सशक्तीकरण तसेच आत्मनिर्भरतेच्या दृष्टीकोनातुन ह्यूमन मल्टीपर्पज असोसिएशन तर्फे 12 ऑगस्ट 2020 पासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी “हमारी पहचान” या मॅरेथॉन सभेचे आयोजन करण्यात येत आहे.

या माध्यमातून कोरोना COVID – 19 विषाणूच्या महामारीमुळे पसरलेल्या निराशेतून महिला वर्गाला बाहेर काढून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या योजनेला जिल्हाभर कार्यन्वित करण्या करिता ह्यूमन मल्टीपर्पज असोसिएशन चंद्रपूर शाखेचे गठन करण्यात आले.
अध्यक्षपदी नाहीद काजी, उपाध्यक्षपदी निक्की बाजी, सचिवपदी शाहीन पठाण यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अभिनंदन शाहिस्ता खान पठाण अध्यक्ष ह्यूमन वेलफअर असोसिएशन, अधिवक्ता व मार्गदर्शक प्रीतिशा साहा यांनी केले.
संघटनेतर्फे 15 ऑगस्ट सिस्टर कॉलोनी, 16 तारखेला भद्रावती 17 ला दादमहल वॉर्ड, 18 ला तुकूम येथे सभा घेण्यात आल्या.
या योजनेला महिलांचा उतस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here