स्व. राजीव गांधींचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी – आमदार प्रतिभाताई धानोरकर

चंद्रपूर :  संगणक क्रांतीचे जनक व आधुनिक भारताचे शिल्पकार स्व. राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा ते अवघ्या चाळीस वर्षांचे होते. त्यावेळी राजीव गांधी यांनी ‘डिजिटल इंडिया’चा नारा दिला, त्यामुळे आज आपल्याला प्रगतशील देश दिसून येत आहे. त्यांचे विचार युवकांनी अंगिकाराची गरज असल्याचे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. त्या स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी  चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेस ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय ज्येष्ठ नेते, महिला शहर अध्यक्ष सुनीताताई अग्रवाल , अनुसूची जाती प्रदेश उपाध्यक्ष अश्विनीताई खोबरागडे, विरोधी पक्षनेते मनपा सुरेश महाकुलकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते शफिक अहमद, माजी सभापती मनपा संतोष  लहामगे, प्रदेश युवा काँग्रेस सचिव महाराष्ट्र सचिन कात्याल, युवा काँग्रेस सचिव महाराष्ट्र प्रदेश रूचीत दवे, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हरीश कोत्तावर,  युवक काँग्रेस शहर अध्यक्ष  राजेश अडुर,शहर उपाध्यक्ष युवक काँग्रेस नौशाद शेख, जिल्हा अध्यक्ष  NSUI यश दत्तात्रेय, महिला अध्यक्ष अनुताई  दहेगावकर, नगरसेवक निलेश खोब्रागडे, नगर सेविका ललिता रेवल्लीवार, माजी नगर सेवक अजय खंडेलवाल, माजी नगर सेवक प्रस्सना शिरवार, माजी नगरसेवक दुर्गेश  कोडाम, माजी नगर सेविका काझी मॅडम,  ज्येष्ठ काँग्रेस नेते युसूफ भाई,हारून भाई, अशोक मत्ते, उमाकांत धांडे, ताजू भाई, राजू वासेकर, माजी NSUI अध्यक्ष निखिल काछेला, शालिनीताई भगत, परवीन शेख, महिला उपाध्यक्ष प्रिया चंदेल, तवांगर खान, रमिझ शेख, मीनल शर्मा,आकाश तिवारी,धरमु तिवारी,सलीम शेख,राजू त्रिवेदी,केतनदूर्षेलवार, साबीर सिद्दीकी,श्रीनिवास बंडेवार, रवी रेड्डी, भानेश जंगम, मोहन डोंगरे, जावेद कुरेशी, झाकीर भाई, संजय गंपावर, दीपक कटकोजवर, दिलीप पल्लेवार, एड. वाणी दारला, अनु जंगम, मनोज चोंबुलवार, निहाल शेख, शुभम कार्लेकर यांची उपस्थित होती.

त्यांच्याच विचारातून कांग्रेसने पुढे जागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाला वाट करून दिली. मतदाराचे वय २१ वर्षांहून १८ वर्षांवर आणले तेही राजीव गांधींनी.कारण, त्यांचा नव्या पिढीच्या समंजसपणावर भरवसा होता.
या नव्या भारताचे जन्मदाते राजीवच. राजीवजी अकाली गेले नसते, तर भारताचे भवितव्य आणखी वेगळ्या शैलीत लिहिले गेले असते. असे देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले. यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी,  ग्रामीण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, ज्येष्ठ काँग्रेस नेते शफिकजी अहमद यांनी स्व.राजीव गांधी भारताचे माजी पंतप्रधान यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संचालन गोपाळ अमृतकर यांनी केले तर आभार एनएसयूआई प्रदेश सरचिटणीस कुणाल चाहरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here