
घुग्गुस(प्रतिनिधी)१८ऑगस्ट
घुग्घुस येथुन जवळच असलेल्या शेनगाव येथील राहणा-या सौ.वंदना परशुराम आत्राम (३५) हिने आज मंगळवारला सकाळी ६ वाजता दरम्यान राहते घरीच गळफास लावुन आत्महत्या केली. गावातील नागरिकांना ही माहिती मिळताच घुग्घुस पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले.घुग्घुस पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी चंद्रपुर येथे पाठविले आहे.घुग्घुस पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे.आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.