चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1121

चंद्रपूर, दि. 17 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1121 झाली आहे. गेल्या 24 तासात 16 नवीन बाधित पुढे आले असून 31 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 749 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 361 बाधित उपचार घेत आहे. आतापर्यंत 749 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 9 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मात्र यापैकी बहुतांशी बाधित हे अन्य आजाराने त्रस्त होते.

आज पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील 8 जणांचा सहभाग आहे. यामध्ये बालाजी वार्ड, जटपुरा गेट, पंचशील चौक, सितलामाता परिसरातील बाधितांचा समावेश असून बहुतेक संपर्कातून व श्वसनाच्या आजारातून पुढे आलेले बाधित आहेत. नागरिकांनी परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर पाठोपाठ राजुरा तालुक्यातील तीन बाधितांच्या समावेश आहे. यामध्ये टेंभुरवाही  व अमराई वार्ड, बहाडे प्लॉट येथील बाधितांचा समावेश आहे.

भद्रावती तालुक्यातील हनुमान वार्ड येथील 2 बाधित तर सुमठाणा येथील एक बाधित अशा एकूण 3 जणांचा सहभाग आहे. संपर्कातून हे बाधित पुढे आले आहे. तर मुल येथील एका बाधिताचा समावेश आहे. भेजगाव येथील हा बाधित संपर्कातून पुढे आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here